Youtuber Bonu Komali Death: ‘आय लव्ह यू आई’; परदेशात असलेल्या आईला शेवटचा मेसेज.. 21 वर्षीय युट्यूबरने स्वतःला संपवलं

आईला शेवटचा मेसेज पाठवल्यानंतर कोमलीने आपला फोन स्विच ऑफ केला. आईने वारंवार फोन करूनही संपर्क न झाल्याने तिने कोमलीच्या एका मित्राला घरी पाठवले. यानंतर सर्व घटना समोर आली.

Youtuber Bonu Komali Death: ‘आय लव्ह यू आई’; परदेशात असलेल्या आईला शेवटचा मेसेज.. 21 वर्षीय युट्यूबरने स्वतःला संपवलं

Youtuber Bonu Komali Death : हैदराबादमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुण युट्यूबरच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या 21 वर्षांच्या बोनू कोमली हिने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कुवेतमध्ये असलेल्या आपल्या आईला व्हॉट्सॲपवर एक भावनिक मेसेज पाठवला होता. या घटनेमुळे सोशल मीडिया विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आईला पाठवला अखेरचा संदेश
मूळची विशाखापट्टणमची असलेली बोनू कोमली हैदराबादमध्ये राहून B.Sc चे शिक्षण घेत होती. अभ्यासासोबतच ती यूट्यूबवर लाइफस्टाइल कंटेंट तयार करायची. सोमवारी तिने कुवेतमध्ये कामाला असलेल्या आपल्या आईला मेसेज केला, ज्यामध्ये तिने लिहिले होते, "आय लव्ह यू आई… भावाची काळजी घे." हा मेसेज पाठवल्यानंतर तिने आपला फोन स्विच ऑफ केला. आईने वारंवार फोन करूनही संपर्क न झाल्याने तिने कोमलीच्या एका मित्राला घरी पाठवले. दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास जेव्हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा कोमली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

हेही वाचा – Suspicious Death: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा मनालीत गूढ मृत्यू; बंद खोलीत सापडला मृतदेह, राजकारणात खळबळ

एकटं राहणं आणि करिअरची धडपड
कोमली गेल्या 11 महिन्यांपासून हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने एकटीच राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ती यूट्यूबच्या माध्यमातून पार्ट-टाइम काम करत होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते आणि ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायची. मात्र, पडद्यावर हसणारी ही मुलगी खासगी आयुष्यात एवढ्या मोठ्या दुःखातून जात असेल, याची कल्पना कोणालाही नव्हती. पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून कोमलीचा फोन, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू केली आहे. कोमलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

प्रेमभंग आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल?
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोमली गेल्या 3 वर्षांपासून एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि युट्यूबरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, अलीकडेच त्यांचा ब्रेकअप झाला होता, ज्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलीने सुमारे 6 महिन्यांपूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या अपयशी प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यामुळेच तिने आपले जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तिच्या मित्रांची आणि शेजाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. ब्रेकअपसाठी तिचा जोडीदार जबाबदार होता का, किंवा तिला कोणी प्रवृत्त केले होते का, या बाजूने पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा – Instagram Safety Survey : तुमची मुलं इन्स्टाग्रामवर किती सुरक्षित? मेटाच्या अंतर्गत सर्व्हेतून धक्कादायक वास्तव समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number