‘मंजिल मौत है…’ असं स्टेटस ठेवलं अन् मित्रांसोबत गेला ट्रिपला; नियमांची पायमल्ली पडली महागात, 18 वर्षीय तरुणाचा धबधब्यात बुडून अंत

नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून ढगफुटीचा कडक इशारा देण्यात आला होता. तसेच, सुरक्षेसाठी सर्व पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरीही, काही पर्यटकांनी नियमांना केराची टोपली दाखवली.

‘मंजिल मौत है…’ असं स्टेटस ठेवलं अन् मित्रांसोबत गेला ट्रिपला; नियमांची पायमल्ली पडली महागात, 18 वर्षीय तरुणाचा धबधब्यात बुडून अंत

Youth Drowned in Chorchavdi Waterfalls Nashik : 'मंजिल मौत है, सफर का मजा लो' असे स्टेटस दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच ठेवणाऱ्या एका तरुणाचा धक्कादायक अंत झाला आहे. हे स्टेटस नाशिक जिल्ह्यातील वडगाव पंगू येथील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय ऋषिकेश शशिकांत संसारे याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपडेट केले होते. दुर्दैवाने, त्याचे हेच स्टेटस पुढे खरे ठरले. ऋषिकेशच्या या अकाली मृत्यूनंतर सोशल मीडियावर हे स्टेटस प्रचंड व्हायरल होत असून, संपूर्ण नाशिक परिसरात यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचा इशारा डावलून मित्रांसोबत पर्यटनाचा बेत
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून ढगफुटीचा कडक इशारा देण्यात आला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असतानाही, काही पर्यटकांनी नियमांना केराची टोपली दाखवली. ऋषिकेश संसारे हा तरुण मंगळवारी आपल्या मित्रांना सोबत घेऊन चोरचावडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता. धबधब्याच्या परिसरात आनंद लुटत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या एका अतिशय खोल डोहात वाहून गेला.

हेही वाचा – Nagpur Missing Family : नागपुरातून गायब झालेले ते कुटुंब अखेर 10 दिवसांनी सापडलं; धक्कादायक कारण आलं समोर

24 तासांनंतर खोल डोहातून मृतदेह बाहेर
मंगळवारी दुपारी घडलेल्या या थरारक दुर्घटनेनंतर तात्काळ यंत्रणा हलली. देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहते आणि चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली. मालेगावचे स्थानिक जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र मुसळधार पाऊस, वाढता अंधार आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे मोहीम थांबवावी लागली. त्यानंतर बुधवारी सकाळी धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) 30 प्रशिक्षित जवान आधुनिक उपकरणांसह दाखल झाले. सलग रेस्क्यू ऑपरेशन राबवून अखेर बुधवारी दुपारी 3:30 वाजता ऋषिकेशचा मृतदेह दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला.

पोलिसांकडून मृतदेह ताब्यात, प्रशासनाचे कडक आवाहन
24 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर शोधकर्त्यांना ऋषिकेशचा मृतदेह शोधण्यात यश आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. बंदी हुकवून अशा धोकादायक ठिकाणी जाणे किती जिवावर बेतू शकते, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने पर्यटकांना कोणत्याही प्रतिबंधित किंवा धोकादायक पर्यटनस्थळांवर न जाण्याचे अत्यंत कडक इशारा पुन्हा एकदा दिला आहे.

हेही वाचा – Maharashtra Farmers Protest : सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, विधान भवनासमोर धान्य फेकत आंदोलन; तुपकर पोलिसांच्या ताब्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number