Cyber ​​Fraud Case: तुमचीही सायबर फसवणूक झाली आहे का? ‘इतक्या’ मिनिटांत तक्रार दाखल केल्यास परत मिळू शकतात पैसे

पूर्वी फसवणुकीनंतरची पहिली तीन तासांची वेळ महत्त्वाची मानली जात होती. पण आता UPI व तत्काळ पेमेंट प्रणालीमुळे काही सेकंदांत पैसे अनेक खात्यांत फिरतात.

Cyber ​​Fraud Case: तुमचीही सायबर फसवणूक झाली आहे का? ‘इतक्या’ मिनिटांत तक्रार दाखल केल्यास परत मिळू शकतात पैसे

Cyber ​​Fraud Case: डिजिटल व्यवहार वाढल्यानंतर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. स्कॅमरचे जाळे इतके व्यापक झाले आहे की फसवणूक झाल्यानंतर आरोपींना शोधणे कठीण ठरते. मात्र, सायबर तज्ञांच्या मते फसवणुकीनंतरचे पहिले ‘गोल्डन अवर्स’म्हणजेच सुमारे 60 मिनिटे या काळात त्वरित तक्रार दाखल केली तर पैसे वसूल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

फसवणूक कळताच तात्काळ तक्रार 

सप्टेंबर 2025 मध्ये कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील भाजप खासदार डॉ. के. सुधाकर यांच्या पत्नी प्रीती यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला मुंबई सायबर क्राइम पोलिसांचा अधिकारी म्हणून ओळख दिली व प्रीती यांच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचे सांगत चौकशीचे खोटे नाटक रचले. भीती दाखवत त्यांना अटक करण्याची धमकी देत त्यांनी 1.4 दशलक्ष (14 लाख रुपये) ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रीती यांनी 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल केला. पोलिसांनी तातडीने फसवणूक करणाऱ्याचे खाते गोठवले आणि संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली. तात्काळ तक्रारीमुळेच हे शक्य झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Noida Cyber Fraud: नोएडातील आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक उघड; गुंतवणुकीच्या नावाखाली 12 कोटींचा गंडा

हॉटेल बुकिंग स्कॅम 

ऑक्टोबरमध्ये मुंबईतील एका महिलेला ऑनलाइन हॉटेल बुक करताना स्कॅमरने फसवून 93,000 रुपये लुटले. पण व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच त्या महिलेने आणि तिच्या पतीने बँक तसेच पोलिसांना लगेच कळवले. तक्रार ‘गोल्डन अवर्स’मध्ये दाखल झाल्याने फसवणूक करणाऱ्याचे खाते गोठवण्यात आले आणि संपूर्ण रक्कम सुरक्षित वसूल करण्यात आली.

‘गोल्डन अवर्स’ म्हणजे नेमके काय?

पूर्वी फसवणुकीनंतरची पहिली तीन तासांची वेळ महत्त्वाची मानली जात होती. पण आता UPI व तत्काळ पेमेंट प्रणालीमुळे काही सेकंदांत पैसे अनेक खात्यांत फिरतात. त्यामुळे तज्ञांच्या मते आजच्या घडीला पहिले 60 मिनिटे अत्यंत निर्णायक ठरतात. या काळात तक्रार मिळाली तर रक्कम स्कॅमरच्या पहिल्याच खात्यात असल्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे खाते तातडीने फ्रीझ करणे शक्य होते.

हेही वाचा – Thane Crime: ठाण्यात फॅमिली कोर्ट परिसरातील कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी पीडितेला केकमधून दिलं गुंगीचे औषध

फसवणूक झाली तर तात्काळ काय करावे?

1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर त्वरीत कॉल करा.
cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा.
तुमच्या बँकेला लगेच कळवा आणि व्यवहार थांबवण्याची विनंती करा.
तक्रार जितक्या जलद कराल तितकी रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक असते.

बैतूल येथील सायबर तज्ज्ञ दीपेंद्र सिंह यांच्या मते, आता पैसे त्वरित ट्रान्सफर होतात. त्यामुळे फसवणुकीनंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा आहे. तर नागपूरचे सायबर डीसीपी लोहित मतानी सांगतात की, 1930 वर कॉल आल्याबरोबर पोलीस सर्व संशयित खात्यांवर ‘लिएन’ (फ्रीझ) लावतात. न्यायालयाच्या आदेशानंतर ती रक्कम पीडिताला परत दिली जाते. सायबर फसवणूक झाल्यावर अनेक जण भीती, लाज किंवा गैरसमजामुळे तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. काहीजण तर पुन्हा स्कॅमरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. या विलंबामुळे रक्कम अनेक खात्यांत फिरते आणि अखेर काढून घेतली जाते, त्यामुळे वसुली जवळपास अशक्य होते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number