यवतमाळ जिल्ह्यात 212 जण कोरोनामुक्त, 151 जण पॉझेटिव्ह चार मृत्यु

यवतमाळ, दि. 8 : गत 24 तासात जिल्ह्यात चार मृत्युसह 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 212 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये पुसद येथील […]

यवतमाळ जिल्ह्यात 212 जण कोरोनामुक्त, 151 जण पॉझेटिव्ह चार मृत्यु

यवतमाळ, दि. 8 : गत 24 तासात जिल्ह्यात चार मृत्युसह 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 212 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 151 जणांमध्ये 95 पुरुष आणि 56 महिला आहेत. यात यवतमाळातील 58 रुग्ण, पुसद येथील 34, पांढरकवडा 13, महागाव 12, नेर 8, दिग्रस 7, कळंब 3, आर्णि 2, बाभुळगाव 2, दारव्हा 2, घाटंजी 2, राळेगाव 1, वणी 1, उमरखेड़ 1, झरीजामणी 1 आणि 4 इतर शहरातील रुग्ण आहेत. सोमवारी एकूण 801 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 650 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1872 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19425 झाली आहे. 24 तासात 212 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17071आहे. तर जिल्ह्यात एकूण 482 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 173663 नमुने पाठविले असून यापैकी 171845 प्राप्त तर 1818 अप्राप्त आहेत. तसेच 152420 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number