Droupadi Murmu Meet Women’s Indian Team: विश्वचषक विजयानंतर महिला संघाने घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट; राष्ट्रपती म्हणाल्या, ‘तुम्ही नवीन पिढीसाठी…’

भेटीदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी राष्ट्रपतींना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली.

Droupadi Murmu Meet Women’s Indian Team: विश्वचषक विजयानंतर महिला संघाने घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट; राष्ट्रपती म्हणाल्या, ‘तुम्ही नवीन पिढीसाठी…’

Droupadi Murmu Meet Women’s Indian Team: नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. महिला विश्वचषक 2025 विजेत्या भारतीय संघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रपतींनी संघाचे अभिनंदन करत त्यांना ‘तरुण पिढी आणि देशातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण’ असे संबोधले.

हरमनप्रीतकडून जर्सीची भेट

भेटीदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी राष्ट्रपतींना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली. संपूर्ण संघाने राष्ट्रपतींसोबत वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटोसेशन केले, ज्यात आनंद आणि अभिमानाचे क्षण कैद झाले.

हेही वाचा – ‘तुमच्या चेहऱ्यावरील तेज…’, महिला खेळाडूच्या ‘या’ भन्नाट प्रश्नावरील पंतप्रधानांची रिॲक्शन पाहाच

राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रेरणादायी भाष्य

राष्ट्रपतींनी संघाचे अभिनंदन करताना सांगितले, ‘या मुलींनी देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने आज लाखो तरुणींना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी न्यूझीलंडवरील विजयाचा उल्लेख करत म्हटलं की, सामन्यातील चढ-उतार असूनही लोकांना खात्री होती आपल्या मुली नक्की जिंकतील!’ मुर्मू यांनी संघातील विविध पार्श्वभूमीच्या खेळाडूंना “भारताचे खरे प्रतिबिंब” असे म्हणत गौरविले.   

हेही वाचा –  PM Modi ICC Worldcup women Meeting : पंतप्रधान मोदींनी आयसीसी महिला विश्वचषक ट्रॉफीला हात लावला नाही, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

भारतीय संघाने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास घडवला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात 52 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच 50 षटकांचा महिला विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या दोघींच्या कामगिरीने भारताला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. मुर्मू यांनी मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचंही विशेष कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘ही केवळ क्रीडा कामगिरी नाही, तर भारतातील महिलांच्या प्रगतीचं प्रतीक आहे.’
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number