Women’s Asia Cup 2025: भारतीय महिला हॉकी संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत; उद्या चीन संघाशी होणार सामना

भारतीय संघाने 13 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात जपानविरुद्ध सुरुवातीची आघाडी गमावली आणि 1-1 अशी बरोबरी साधली, ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या.

Women’s Asia Cup 2025: भारतीय महिला हॉकी संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत; उद्या चीन संघाशी होणार सामना

Women's Asia Cup 2025: महिला आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाने आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ आता 14 सप्टेंबर रोजी यजमान संघ चीनशी सामना करेल. भारतीय संघाने 13 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात जपानविरुद्ध सुरुवातीची आघाडी गमावली आणि 1-1 अशी बरोबरी साधली, ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर, चीनने सुपर-4 फेरीत दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला.

हेही वाचा – PSL Team Boycotts IND vs PAK Match: IPL फ्रँचायझीनंतर आता PSL टीमचा भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार

जपानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. ब्युटी डंग डंगने 7व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी दिली. मात्र, जपानने पुनरागमन केले आणि शेहो कोबायाकावाने 58व्या मिनिटाला बरोबरी गोल केला. यामुळे दोन्ही संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी राहिली. यापूर्वीच्या पूल स्टेज सामन्यातही दोघांमध्ये सामना 2-2 या बरोबरीत संपला होता. जपानविरुद्धच्या या खेळीमुळे भारत थेट अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला चीन आणि कोरिया यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागली.

हेही वाचा – Pahalgam attack victim’s widow : क्रिकेटपटू काय करतायतं? पहलगाम हल्ल्यातील पीडितेचा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला कडाडून विरोध

चीन अव्वल 

सुपर-4 टप्प्यात, चीनने 3 विजयांमधून 9 गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले. भारताने 1 विजय, 1 पराभव आणि 1 बरोबरी, एकूण 4 गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहिला. जपान तिसऱ्या स्थानावर तर दक्षिण कोरिया चौथ्या स्थानावर राहिला. अशा प्रकारे भारताचा महिला आशिया कप 2025 मधील अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला असून आता भारतीय संघ यजमान चीनशी जोरदार सामना करणार आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number