Strait of Hormuz: ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा सुरू होणार? इराणचा अमेरिकेला चर्चेसाठी नवा प्रस्ताव; अमेरिकेसमोर ठेवल्या ‘या’ कडक अटी

इराणने अमेरिकेसमोर चर्चेचा एक नवीन प्रस्ताव मांडला असून, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जलमार्ग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

Strait of Hormuz: ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा सुरू होणार? इराणचा अमेरिकेला चर्चेसाठी नवा प्रस्ताव; अमेरिकेसमोर ठेवल्या ‘या’ कडक अटी

Strait of Hormuz: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने राजनैतिक पातळीवर एक मोठे पाऊल उचलले आहे. इराणने अमेरिकेसमोर चर्चेचा एक नवीन प्रस्ताव मांडला असून, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जलमार्ग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रस्तावाद्वारे इराणने दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवून प्रदेशात स्थिरता प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेला असून इराणने त्यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात युद्धबंदी आणि नाकेबंदी उठवण्याची अट
इराणने सादर केलेल्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यानुसार, येत्या एका महिन्याच्या आत दोन्ही देशांमध्ये एक ठोस करार होणे अपेक्षित आहे. या करारामध्ये प्रामुख्याने त्वरित युद्धबंदी लागू करणे आणि अमेरिकेने इराणवर लादलेली नौदल नाकेबंदी उठवणे या अटींचा समावेश आहे. तसेच इराण आणि लेबनॉनमध्ये सध्या सुरू असलेले लष्करी संघर्ष कायमस्वरूपी थांबवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी इराणने केली आहे. या उपाययोजनांमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर होत असलेला विपरित परिणाम कमी होऊन बाजारपेठेत स्थिरता येईल, असा दावा इराणने केला आहे.

हेही वाचा – US Returns Artefacts: भारताचा ऐतिहासिक विजय! अमेरिकेने परत केल्या 657 प्राचीन वस्तू; कोट्यवधींचा सांस्कृतिक वारसा अखेर देशाच्या ताब्यात

अणुकार्यक्रमावर चर्चेसाठी इराण सज्ज
प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात इराणने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या आपल्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ही चर्चा पहिल्या टप्प्यातील अटींच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून असेल. जर पहिल्या महिन्यात युद्धबंदी आणि नाकेबंदी उठवण्याचा करार यशस्वी झाला, तर त्यानंतरच्या महिन्यात इराण अणुकार्यक्रमाबाबत चर्चेची पुढील फेरी सुरू करण्यास तयार आहे. थोडक्यात, अमेरिकेने आपली आक्रमक भूमिका मागे घ्यावी आणि निर्बंध शिथिल करावेत, असे स्पष्ट संकेत इराणने या प्रस्तावाद्वारे दिले आहेत. आता अमेरिका या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number