U19 Asia Cup 2025 : U-19 आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना होणार?; सेमीफायनल्समध्ये ‘या’ चार संघांमध्ये लढत

गट टप्प्यात भारताने प्रथम युएई, त्यानंतर पाकिस्तान आणि शेवटी मलेशियाचा पराभव केला. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाने विजयी घोडदौड केली.

U19 Asia Cup 2025 : U-19 आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी सामना होणार?; सेमीफायनल्समध्ये ‘या’ चार संघांमध्ये लढत

U19 Asia Cup 2025: 19 वर्षांखालील आशिया कप 2025 मध्ये उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वैभव सूर्यवंशीच्या दमदार खेळीमुळे भारतीय युवा संघाने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारताची कामगिरी सध्या स्पर्धेतील सर्वात प्रभावी ठरली आहे. 

भारताची विजयी घोडदौड

गट टप्प्यात भारताने प्रथम युएई, त्यानंतर पाकिस्तान आणि शेवटी मलेशियाचा पराभव केला. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाने विजयी घोडदौड केली. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकले असले तरी भारताकडून झालेल्या पराभवामुळे त्यांना गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा – IPL Auction 2026: आयपीएल ऑक्शनमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान; नेमकं प्रकरण काय?

श्रीलंका आणि बांगलादेशची पात्रता

दुसऱ्या गटातून बांगलादेश आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने श्रीलंकेवर विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले, तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर राहिला. स्पर्धेच्या नियमांनुसार, एकाच गटातील संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येत नाहीत. त्यामुळे आता भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल.

हेही वाचा – IPL Auction 2026 Sold Unsold Players Full List : आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! Sold-Unsold खेळाडूंची संपुर्ण यादी पाहा

दरम्यान, उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामना होणार नसला तरी अंतिम फेरीत हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. उपांत्य सामने 19 डिसेंबर रोजी, तर अंतिम सामना 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सध्याच्या फॉर्मवरून भारताला विजेतेपदासाठी केवळ दोन पावले दूर असल्याचे चित्र आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number