E20 Fuel Insurance Claim: E20 इंधनामुळे कारचा इन्शुरन्स क्लेम नाकारला जाणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल दाव्यावर सरकारने दिलं स्पष्टीकरण

सोशल मीडियावरील या खळबळजनक दाव्यामागचे सत्य शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत 'पीआयबी फॅक्ट चेक' (PIB Fact Check) या संस्थेने तपास केला.

E20 Fuel Insurance Claim: E20 इंधनामुळे कारचा इन्शुरन्स क्लेम नाकारला जाणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल दाव्यावर सरकारने दिलं स्पष्टीकरण

E20 Fuel Insurance Claim: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांना पर्याय म्हणून E20 आणि E25 सारख्या इथेनॉल-मिश्रित (Ethanol-Blended) इंधनांचा वापर वेगाने वाढतो आहे. हे इंधन सामान्य पेट्रोलपेक्षा काहीसे स्वस्त असल्याने वाहनधारकांकडून याला पसंती दिली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक धक्कादायक बातमी वेगाने व्हायरल होत होती. जर तुम्ही तुमच्या कारमध्ये E20 पेट्रोल वापरले आणि त्यामुळे इंजिन खराब झाले, तर विमा कंपन्या तुमचा इन्शुरन्स क्लेम (विमा दावा) नाकारू शकतात, असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला होता. या बातमीमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यावर आता सरकारने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारी यंत्रणेकडून ‘फेक न्यूज’चा पर्दाफाश 
सोशल मीडियावरील या खळबळजनक दाव्यामागचे सत्य शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत ‘पीआयबी फॅक्ट चेक’ (PIB Fact Check) या संस्थेने तपास केला. पीआयबीने त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) खात्यावरून स्पष्ट केले आहे की, व्हायरल होत असलेली ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे. विशेष म्हणजे, एका मोठ्या प्रसारमाध्यमाच्या सोशल मीडिया अपडेटचा स्क्रीनशॉट वापरून, ज्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो लावण्यात आला होता, ही अफवा पसरवली जात होती. पीआयबीने या बातमीवर ‘फेक न्यूज’ (Fake News) असा स्पष्ट शिक्का मारला आहे.

हेही वाचा – EPFO 3.0: पीएफ धारकांसाठी मोठी बातमी; आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार पैसे; ‘EPFO 3.0’ ची चाचणी यशस्वी

‘PIB Fact Check’ चा वाहनधारकांना मोठा दिलासा 
पीआयबीने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, “काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा चुकीचा दावा केला जात आहे की, E20 इंधन वापरल्यास वाहनाचा विमा दावा नाकारला जाऊ शकतो. परंतु, आमचा तपास सांगतो की हा दावा पूर्णपणे खोटा आहे.” या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकताना सांगण्यात आले की, वाहनात E20 इंधनाचा वापर केला तरीही संबंधित मोटर विमा पॉलिसी (Motor Insurance Policy) पूर्णपणे वैध राहतात. इंधनामुळे विमा दावा फेटाळण्याचा कोणताही नियम अस्तित्वात नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नका 

दरम्यान, अशा प्रकारच्या संवेदनशील आणि आर्थिक बाबींशी संबंधित दाव्यांची खातरजमा नेहमी अधिकृत सरकारी स्रोतांकडूनच करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूर्ण माहिती असल्याशिवाय अशा बातम्या समाजमाध्यमांवर शेअर करू नयेत. जर तुम्हालाही अशीच एखादी संशयास्पद माहिती किंवा मेसेज आढळल्यास, तुम्ही थेट ‘पीआयबी फॅक्ट चेक’च्या उपलब्ध व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर संपर्क साधून त्याची सत्यता पडताळून पाहू शकता, जेणेकरून चुकीची माहिती पसरण्यास आळा बसेल.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number