Larry Ellison : 15 वर्षांपूर्वीच्या वचनपूर्तीसाठी करोडोंची संपत्ती दान; सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ‘या’ दानशूराचं नाव सामील

एलिसन यांचे निधी प्रामुख्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत जातात.

Larry Ellison : 15 वर्षांपूर्वीच्या वचनपूर्तीसाठी करोडोंची संपत्ती दान; सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ‘या’ दानशूराचं नाव सामील

Larry Ellison: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांनी त्यांच्या संपत्तीपैकी तब्बल 95 टक्के दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 373 अब्ज डॉलर्स (31.24 लाख कोटींहून अधिक) इतकी आहे. एलोन मस्कनंतर सर्वात श्रीमंत ठरलेल्या एलिसन यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली. विशेष म्हणजे, ओरेकलच्या एआय प्रकल्पांमुळे कंपनीचे शेअर्स झपाट्याने वाढले, ज्याचा थेट फायदा एलिसन यांना झाला.

2010 मध्ये दिले होते वचन

लॅरी एलिसन यांनी जवळपास 15 वर्षांपूर्वी, म्हणजे 2010 मध्येच त्यांच्या संपत्तीपैकी 95 टक्के दान करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग ओरेकलमधील 41 टक्के भागेदारी आणि टेस्लामधील गुंतवणुकीतील आहे.

कोणाला दान करण्यात येणार पैसे? 

एलिसन यांचे निधी प्रामुख्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत जातात. ही ना-नफा संस्था आरोग्यसेवा, अन्नसुरक्षा, हवामान बदल आणि एआय संशोधन यांसाठी काम करते. 2027 मध्ये उघडणाऱ्या या संस्थेच्या कॅम्पसवर 1.3 अब्ज डॉलर खर्च केला जाणार आहे. 

हेही वाचा – Afghan Boy First Picture : प्लेनच्या 'लँडिंग गिअर'मध्ये लपून काबूलहून दिल्लीत पोहोचला 13 वर्षांचा अफगाणी मुलगा

यापूर्वी त्यांनी USC (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ) ला कर्करोग संशोधनासाठी 200 दशलक्ष डॉलर, एलिसन मेडिकल फाउंडेशन ला तब्बल 1 अब्ज डॉलर दान केले आहे. गेल्या वर्षी एलिसन यांनी त्यांच्या संशोधन केंद्राचे नेतृत्व प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉन बेल यांच्याकडे सोपवले होते. पण प्रकल्पाचे जटिल स्वरूप आणि व्यवस्थापनातील अडचणींमुळे बेल यांनी काही आठवड्यांतच राजीनामा दिला. त्यानंतर मिशिगन विद्यापीठाचे माजी अध्यक्ष सॅंताना ओनो यांची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा – Bangkok Road Sinkhole Video : बँकॉकमध्ये चार पदरी रस्ताच जमिनीत गडप झाला! थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

कोडर ते अब्जाधीश

इलिनॉय विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर एलिसन यांनी डेटाबेस कोड लिहिण्यापासून करिअरची सुरुवात केली. 1977 मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज ची स्थापना केली, जी नंतर ओरेकल म्हणून ओळखली जाऊ लागली. 2014 पर्यंत ते कंपनीचे सीईओ होते. सध्या ते कार्यकारी अध्यक्ष आणि सीटीओ म्हणून कार्यरत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number