Akshita Dhankar : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत ध्वजारोहण करणाऱ्या अक्षिता धनकर कोण? वाचा सविस्तर

या ऐतिहासिक सोहळ्यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा बहुमान मिळवला.

Akshita Dhankar : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत ध्वजारोहण करणाऱ्या अक्षिता धनकर कोण? वाचा सविस्तर

Akshita Dhankar : देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर केवळ भारताचे सामर्थ्यच दिसले नाही, तर नारीशक्तीचा नवा अध्यायही लिहिला गेला. या ऐतिहासिक सोहळ्यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा बहुमान मिळवला. हा क्षण केवळ अक्षिता यांच्यासाठीच नव्हे, तर लष्करी सेवेत सक्रिय असणाऱ्या देशातील सर्व महिलांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.

कोण आहेत अक्षिता धनकर?
हरियाणातील कासनी गावात जन्मलेल्या अक्षिता धनकर यांना लष्करी सेवेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडीलही भारतीय हवाई दलात सेवा बजावत होते. अक्षिता यांनी दिल्लीतील श्री गुरु तेग बहादूर खासला कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच त्या NCC मध्ये सामील झाल्या, जिथे त्यांनी कॅडेट सार्जंट मेजर (CSM) म्हणून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. हवाई दलात सामील होण्याचे त्यांचे स्वप्न 'AFCAT' परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि म्हैसूर येथील एअर फोर्स सिलेक्शन बोर्डातून निवड झाल्यानंतर यशस्वीरित्या पूर्ण झाले.

यशाची गरुडझेप; 3 वर्षांत गाठले मोठे पद
अक्षिता धनकर यांची निवड हवाई दलाच्या प्रशासकीय (ADM) शाखेत झाली. जून 2023 मध्ये त्यांनी 'फ्लाइंग ऑफिसर' म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अत्यंत शिस्तबद्ध आणि कर्तबगार असलेल्या अक्षिता यांनी अवघ्या तीन वर्षांतच 'फ्लायट लेफ्टनंट' पदापर्यंत मजल मारली. 77 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना ध्वजारोहणात मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

हेही वाचा – India Europe Trade Deal: "आम्ही रणनीतिक भागीदारी निवडली कारण…" पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी युरोपीय अध्यक्षांचे सूचक वक्तव्य

परेडमध्ये नारीशक्तीचा डंका: सिमरन बाला आणि निकिता चौधरींचे नेतृत्व

केवळ अक्षिता धनकरच नव्हे, तर या परेडमध्ये इतरही अनेक महिला अधिकाऱ्यांनी इतिहास रचला. 26 वर्षीय सहाय्यक कमांडंट सिमरन बाला यांनी 140 हून अधिक पुरुषांच्या CRPF तुकडीचे नेतृत्व केले. जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असलेल्या सिमरन यांनी या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच स्क्वाड्रन लीडर निकिता चौधरी यांनी हवाई दलाच्या मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number