HJU Convocation Controversy: ‘आधी अपमान, नंतर सन्मान…त्यासाठी आभार’; दीक्षांत समारंभात व्यासपीठावर बेधडपणे बोलणाऱ्या साराचा आणखी एक व्हिडीओ समोर

विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी सारा इस्माईल या विद्यार्थिनीने मंचावर उभे राहून, &quotआमचा अपमान करून नंतर सन्मान केल्याबद्दल धन्यवाद,&quot असे उपरोधिक विधान केले होते.

HJU Convocation Controversy: ‘आधी अपमान, नंतर सन्मान…त्यासाठी आभार’; दीक्षांत समारंभात व्यासपीठावर बेधडपणे बोलणाऱ्या साराचा आणखी एक व्हिडीओ समोर

HJU Convocation Controversy: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील हरदेव जोशी विद्यापीठाचा (HJU) पदवीदान समारंभ सध्या पदव्यांपेक्षा तेथे झालेल्या वादामुळेच चर्चेत आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी सारा इस्माईल या विद्यार्थिनीने मंचावर उभे राहून, “आमचा अपमान करून नंतर सन्मान केल्याबद्दल धन्यवाद,” असे उपरोधिक विधान केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमका वाद काय? आणि विद्यार्थ्यांचा संताप का?
बुधवारी पार पडलेल्या या समारंभासाठी राज्यभरातून विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते. नियमानुसार, विद्यार्थ्यांना विशिष्ट ‘ड्रेस कोड’ पाळण्यास सांगण्यात आले होते. मात्र, 2 तास चाललेल्या प्रदीर्घ भाषणांनंतर केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच मंचावर बोलावून कार्यक्रम आटोपता घेण्याचा प्रयत्न झाला. इतर विद्यार्थ्यांना “पदव्या नंतर घेऊन जा” असे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त विद्यार्थ्यांनी ‘HJU मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पाहुण्यांना माघारी फिरून विद्यार्थ्यांच्या हाती पदव्या सुपूर्द कराव्या लागल्या.

कोण आहे सारा इस्माईल?
सारा इस्माईल ही HJU च्या 2024-25 च्या तुकडीतील पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. ती सोशल मीडियावर ‘Sanelysara’ या नावाने सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तिचे 30,100 हून अधिक फॉलोअर्स आहेत. एक ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर’ (Digital Influencer) म्हणून ती विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सामाजिक मुद्द्यांवर सतत आवाज उठवत असते. पदवीदान समारंभातील तिच्या धाडसी विधानामुळे ती सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा – Jan Vishwas Bill 2026: लोकसभेत ‘जन विश्वास विधेयक’ सादर; आता सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांना बसणार चाप

साराने इन्स्टाग्रामवर दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर साराने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली, “माझे विधान राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या विरोधात नव्हते, तर ते विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभारासाठी होते.” साराने पुढे नमूद केले की, अनेक पालक लांबून प्रवास करून आले होते, पण केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच मंचावर बोलावणे हे पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अपमानजनक होते. प्रशासनाने आधी प्रत्येकाला पदवी मंचावर मिळेल असे आश्वासन दिले होते, ज्याची पायमल्ली करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number