Monsoon Helpline: पूर असो वा दरड कोसळण्याची भीती… अडकून पडल्यास थेट ‘या’ हेल्पलाईन क्रमांकांवर करा संपर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांतता राखण्याचे, सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Monsoon Helpline: पूर असो वा दरड कोसळण्याची भीती… अडकून पडल्यास थेट ‘या’ हेल्पलाईन क्रमांकांवर करा संपर्क

Monsoon Helpline: महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांतता राखण्याचे, सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संकटसमयी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीला बळी न पडता, केवळ शासकीय आणि अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्यभर 24 तास कार्यरत असणारे आपत्कालीन नियंत्रण कक्ष (Control Rooms) कार्यान्वित करण्यात आले आहेत.

राज्य आणि जिल्हा पातळीवरील संपर्कासाठी 'हे' हेल्पलाईन क्रमांक
कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना थेट मंत्रालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता यावा यासाठी 1070 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय नागरिक 09321587143 या मोबाईल क्रमांकावर किंवा 022-22027990 आणि 022-22794229 या दूरध्वनी क्रमांकांवर फोन करून मदत मागू शकतात. तसेच, स्थानिक पातळीवर तातडीने मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आले असून, तेथे संपर्क करण्यासाठी 1077 हा मुख्य हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Khadakwasla Dam Water: खडकवासला ते उजनी… पुण्याच्या धरणांमध्ये पाण्याचा वेग प्रचंड वाढला; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना हाय-अलर्ट

संवेदनशील भागात विशेष लक्ष; न घाबरता संपर्क करण्याचे आवाहन
डोंगरभागात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या आणि पुराचा धोका असलेल्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून तेथील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही संकटाच्या वेळी अथवा अडकून पडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने प्रशासनाने दिलेल्या या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करून मदत मिळवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number