Eid Ul Fitr Moon Sighting Date: भारतात ईद कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या चंद्रदर्शनाची वेळ आणि संभाव्य तारखा

रमजान महिना संपल्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईदची तारीख ही पूर्णपणे चंद्रदर्शनावर अवलंबून असते.

Eid Ul Fitr Moon Sighting Date: भारतात ईद कधी साजरी केली जाईल?  जाणून घ्या चंद्रदर्शनाची वेळ आणि संभाव्य तारखा

Eid Ul Fitr Moon Sighting Date: मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र मानला जाणारा 'रमजान' महिना आता संपणार असून, सर्वांना वेध लागले आहेत ते 'ईद-उल-फित्र' अर्थात 'मीठी ईद'चे. रमजान महिना संपल्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईदची तारीख ही पूर्णपणे चंद्रदर्शनावर अवलंबून असते. सध्याच्या खगोलशास्त्रीय गणनेनुसार, जगभरातील मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असून सौदी अरेबिया आणि भारतात ईद कोणत्या दिवशी साजरी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सौदी अरेबिया, युएई आणि इराणमध्ये 19 मार्चला ईदची शक्यता
भौगोलिक स्थितीमुळे आखाती देशांमध्ये भारताच्या 1 दिवस आधी चंद्र दिसतो. 'आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र केंद्रा'च्या (International Astronomical Center) अंदाजानुसार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इराणमध्ये 18 मार्च रोजी चंद्रदर्शन होण्याची दाट शक्यता आहे. जर 18 तारखेला चंद्र दिसला, तर या देशांमध्ये 19 मार्च रोजी 29 दिवसांच्या उपवासानंतर ईद साजरी केली जाईल. मात्र, 18 तारखेला चंद्रदर्शन न झाल्यास तिथे 20 मार्च रोजी ईद साजरी होईल.

भारतात 20 मार्चला 'मीठी ईद' साजरी होण्याची चिन्हे
भारतात सहसा सौदी अरेबियामध्ये ईद साजरी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सण साजरा करण्याची परंपरा आहे. खगोलशास्त्रीय अंदाजानुसार, जर 18 मार्चला आखाती देशात चंद्र दिसला, तर भारतात 19 मार्च रोजी चंद्रदर्शन अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण भारतात 20 मार्च रोजी 'ईद-उल-फित्र' साजरी केली जाईल. मात्र, जर ढगाळ वातावरणामुळे किंवा अन्य कारणांमुळे चंद्रदर्शन 1 दिवस उशिरा झाले, तर ईदची तारीख 21 मार्चपर्यंत पुढे जाऊ शकते.

हेही वाचा – Shani Dev: शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत हे ओळखायचे 7 सोपे पण महत्त्वाचे संकेत; कधीही करू नका दुर्लक्ष

चंद्रदर्शनानंतरच होणार अंतिम तारखेची घोषणा
जरी खगोलशास्त्र केंद्राने अंदाजित तारखा जाहीर केल्या असल्या, तरी ईदची अधिकृत आणि अंतिम तारीख ही प्रत्यक्ष चंद्रदर्शनानंतरच (रुयत-ए-हिलाल) निश्चित केली जाते. स्थानिक हिलाल कमिटी चंद्राची खातरजमा केल्यानंतर ईदची घोषणा करते. रमजानच्या 30 दिवसांच्या रोजानंतर मिळणारा हा आनंदाचा सण मुस्लिम बांधव एकमेकांना शिरखुरमा देऊन आणि गळाभेट घेऊन साजरा करतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number