Mumbai Local Western Line : मुंबईकरांची लोकल कोंडी! पश्चिम रेल्वेवर उद्या 277 फेऱ्या रद्द; बोरीवली पट्ट्यात तब्बल 5 दिवसांचा मोठा ब्लॉक

तांत्रिक कामामुळे लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. यामुळे बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local Western Line : मुंबईकरांची लोकल कोंडी! पश्चिम रेल्वेवर उद्या 277 फेऱ्या रद्द; बोरीवली पट्ट्यात तब्बल 5 दिवसांचा मोठा ब्लॉक

Mumbai Local Western Line : मुंबई पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी उद्याचा दिवस अतिशय कठीण असणार आहे. कांदिवली ते बोरीवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी रेल्वेने मोठा 'मेगाब्लॉक' घोषित केला आहे. या तांत्रिक कामामुळे उपनगरीय लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम होणार आहे.

लोकल प्रवाशांना मोठा फटका
शनिवारी, 27 डिसेंबर रोजी सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. यामुळे सकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 277 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, 26 आणि 27 डिसेंबरच्या मध्यरात्री धावणाऱ्या अनेक लोकल अंशतः रद्द राहतील. कांदिवली आणि दहिसरदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वेगावर मर्यादा (Speed Restriction) आणली जाणार असल्याने लोकल गाड्यांच्या गतीवरही परिणाम होईल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंतच चालवल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
केवळ लोकलच नाही, तर अनेक महत्त्वाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसला आहे:
– नंदुरबार-बोरीवली एक्सप्रेस आणि अहमदाबाद एक्सप्रेस बोरीवलीऐवजी वसई रोड स्थानकापर्यंतच धावतील आणि तिथूनच पुन्हा सुटतील.
– वलसाड-बोरीवली मेमू डहाणू रोड स्थानकावरच थांबवण्यात येईल.
– 28 डिसेंबर रोजी धावणारी बोरीवली-डहाणू मेमू पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
सुमारे 7 अप आणि 10 डाऊन गाड्यांच्या वेळेत बदल (Rescheduling) करण्यात आला असून, 6 एक्स्प्रेस गाड्या बोरीवली स्थानकावर थांबणार नाहीत.

हेही वाचा – Local Train Update : 164 वर्षांची प्रतीक्षा संपणार ! आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा मुहूर्त ठरला

नेमके काय काम होणार?
बोरीवली स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनेल बसवणे आणि कांदिवली-बोरीवली दरम्यान ट्रॅक स्लीव्हिंग, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड वायरशी संबंधित तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी हा 30 दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा टप्पा 18 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार असला तरी, उद्या होणारे काम सर्वात महत्त्वाचे मानले जात आहे.

प्रवाशांसाठी बेस्टच्या जादा बसेस
रेल्वे सेवा विस्कळीत होणार असल्याने बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या विनंतीनुसार, बोरीवली ते चर्चगेट आणि बोरीवली ते विरार दरम्यान अतिरिक्त बस फेऱ्या चालवल्या जातील. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather Update: मुंबईत 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार पारा; रात्री गारवा तर दुपारी उकाडा; थंडी गायब होऊन पावसाची एन्ट्री?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number