IMD Weather Forecast : देशातील 18 राज्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रात कसं असणार वातावरण?

गेल्या 2 दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा हवामानाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. <br/>

IMD Weather Forecast : देशातील 18 राज्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रात कसं असणार वातावरण?

IMD Weather Forecast : चालू महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जुलैपासून 8 जुलैपर्यंत महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत पावसाने जोरदार धुमाकूळ घातला होता. या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर, मुंबई, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांना पूर आणि पाणीसाठ्याचा मोठा फटका बसला, ज्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा हवामानाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह देशातील एकूण 18 राज्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि तीव्र मेघगर्जनेसह तब्बल 60 ते 70 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उत्तर आणि मध्य भारताला मोठा धोका; पर्वतीय क्षेत्रांमध्ये भूस्खलनाची भीती
दरम्यान, शनिवारी उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ढगफुटीसदृश किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय पूर्व आणि मध्य भारतालाही पावसाचा जोरदार तडाखा बसू शकतो. डोंगराळ आणि पर्वतीय भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलन (landslides) होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारांना या काळात समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या राज्यांवर घोंगावतेय संकट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश या 18 राज्यांमध्ये मोसमी पाऊस तीव्र रूप धारण करणार आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – Palghar Flood Update : काळीज पिळवटणारी घटना! चारही बाजूंनी पाणी, मृतदेहासह कुटुंबाला छतावर काढावी लागली रात्र

महाराष्ट्रात काही काळ विश्रांतीनंतर पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार 
तथापि, महाराष्ट्राचा विचार केला तर 8 जुलैपर्यंत धुवांधार बरसल्यानंतर आता पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा उन्हाचा चटका जाणवू लागला असून तापमानात वाढ झाली आहे; मुंबईत नुकतीच 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून पुढील आठवड्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आगामी 24 तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून हवामान विभागाने तिथल्या नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number