Anthropic AI Ban: ‘आम्ही देशाचे भवितव्य ठरवू, AI कंपनी नाही…; अँथ्रोपिकला ट्रम्प यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, कोणतीही कट्टरपंथी डावी विचारसरणीची कंपनी अमेरिकन सैन्याला युद्धे कशी लढायची आणि ती कशी जिंकायची, हे शिकवणार नाही.

Anthropic AI Ban:  ‘आम्ही देशाचे भवितव्य ठरवू, AI कंपनी नाही…; अँथ्रोपिकला ट्रम्प यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

Anthropic AI Ban:  एआय (AI) जगतात एक मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी कार्यालयांमध्ये आघाडीची एआय कंपनी 'अँथ्रोपिक'च्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, कोणतीही कट्टरपंथी डावी विचारसरणीची कंपनी अमेरिकन सैन्याला युद्धे कशी लढायची आणि ती कशी जिंकायची, हे शिकवणार नाही. या वादाचे मुख्य कारण म्हणजे अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांनी एआय-आधारित हेरगिरी आणि स्वायत्त शस्त्रांच्या वापराशी संबंधित लष्कराच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांनी या भूमिकेला थेट 'राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड' असे संबोधले आहे.

सरकारी कार्यालयातून अँथ्रोपिकची हकालपट्टी
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व सरकारी विभागांना अँथ्रोपिकचे तंत्रज्ञान वापरणे बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. "आम्हाला या तंत्रज्ञानाची गरज नाही, ते आम्हाला नको आहे आणि आम्ही पुन्हा त्यांच्याशी कोणताही व्यवहार करणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. जे विभाग सध्या हे तंत्रज्ञान वापरत आहेत, त्यांना इतर प्रणालींमध्ये स्थलांतरित होण्यासाठी 6 महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच, कंपनीने आपले वर्तन न सुधारल्यास गंभीर कायदेशीर कारवाईचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

पेंटागॉनकडून 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' घोषित
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अधिकृतपणे अँथ्रोपिकला 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकन सैन्यासोबत काम करणारा कोणताही कंत्राटदार किंवा भागीदार आता अँथ्रोपिकसोबत कोणताही व्यवसाय करू शकणार नाही. संरक्षण विभागाला देशाचे रक्षण करण्यासाठी एआय मॉडेल्सवर पूर्ण आणि अनिर्बंध प्रवेश असणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद हेगसेथ यांनी केला आहे. सध्याचे प्रशासन आता सैन्यासाठी अधिक 'देशभक्त' तंत्रज्ञान कंपनीच्या शोधात आहे.

हेही वाचा – Israel Attacked Iran: पुन्हा युद्ध भडकले! इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, खामेनेईंना हलवले सुरक्षित स्थळी

नैतिक मर्यादा आणि सीईओ डारियो अमोदेई यांची भूमिका
या वादाच्या मुळाशी एआयच्या वापरावर लादलेल्या नैतिक मर्यादा आहेत. अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांच्या मते, त्यांच्या कंपनीची नीतिमत्ता त्यांना लष्कराच्या काही विशिष्ट मागण्यांचे पालन करण्यास परवानगी देत नाही. सध्याच्या एआय प्रणाली मानवी देखरेखीशिवाय स्वतःहून निर्णय घेण्याइतक्या विश्वासार्ह नाहीत, असे त्यांचे मत आहे. त्यांनी एआय-आधारित हेरगिरी आणि स्वयंचलित शस्त्रांच्या वापराला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. मात्र, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, लष्करात तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यावर खासगी कंपनीच्या अटी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कमांडर-इन-चीफचा अधिकारच सर्वश्रेष्ठ राहील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number