Nashik Dam: नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली! अवघ्या 48 तासांत गंगापूर धरण 68 टक्क्यांवर; दारणा जलाशयही निम्मे भरलं

दारणा धरणातही पाण्याची पातळी वाढून 50 टक्के साठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 24 प्रमुख धरणांमध्ये सरासरी 35 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.<br/>

Nashik Dam: नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली! अवघ्या 48 तासांत गंगापूर धरण 68 टक्क्यांवर; दारणा जलाशयही निम्मे भरलं

Nashik Dam: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा सकारात्मक परिणाम धरणांवर दिसून येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात अवघ्या 48 तासांत मोठी वाढ झाली असून, धरणाची भराव क्षमता आता 68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. दारणा धरणातही पाण्याची पातळी वाढून 50 टक्के साठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 24 प्रमुख धरणांमध्ये सरासरी 35 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह पश्चिम भागात पावसाची दमदार हजेरी

पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक जलाशयांमध्ये वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गंगापूर धरणात सध्या 3,822 दशलक्ष घनफूट पाणी साठले असून, केवळ 2 दिवसांत साठ्यात सुमारे 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. काश्यपी धरणात 878 दशलक्ष घनफूट म्हणजे 47 टक्के साठा झाला आहे. तर गौतमी-गोदावरी प्रकल्पात 1,583 दशलक्ष घनफूट पाणी जमा होऊन धरण 85 टक्के भरले आहे. दारणा धरणातही 3,538 दशलक्ष घनफूट पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. वालदेवी, भावली आणि मुकणे धरणांतील परिस्थिती सुधारत असली तरी गिरणा आणि पालखेड खोऱ्यातील पाण्याची आवक अद्याप अपेक्षेपेक्षा कमी आहे.

नांदूरमध्यमेश्वर पूर्ण क्षमतेने भरले; नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू

सततच्या पावसामुळे नांदूरमध्यमेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून तेथून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणातून 55,778 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. याशिवाय गौतमी-गोदावरी प्रकल्पातून 2,208 क्यूसेक, तर पालखेड धरणातून 1,322 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार?; हवामान विभागाकडून पुढील आठवड्यासाठी नवा अंदाज जाहीर

काही धरणांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यातील बहुतांश जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा वाढला असला, तरी भाम, भोजापूर, नागासाक्या आणि माणिकपुंज या धरण क्षेत्रांमध्ये अजूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. या भागांत पुढील काही दिवस चांगला पाऊस झाल्यास तेथील जलसाठाही वेगाने वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी मान्सूनच्या हालचालींकडे जलसंपदा विभागासह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number