Water Cut In Thane: ठाण्यात 24 तासांसाठी पाणी कपातीची घोषणा; कोणत्या भागांमध्ये सेवा बंद राहणार? वाचा सविस्तर बातमी

इंदिरानगर परिसरातील पाईपलाईनचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती पाणी कपात करण्यात येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

Water Cut In Thane: ठाण्यात 24 तासांसाठी पाणी कपातीची घोषणा; कोणत्या भागांमध्ये सेवा बंद राहणार? वाचा सविस्तर बातमी

Water Cut In Thane: शहरातील प्रमुख जलवाहिनीच्या कामांसाठी ठाणे महानगरपालिका (TMC) आगामी 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणार आहे. इंदिरानगर परिसरातील पाईपलाईनचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती पाणी कपात करण्यात येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. महापालिकेने X (पूर्वीचे ट्विटर) वर दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजेच 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या वागळे आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभागांत इंदिरानगर जलकुंभाला जोडण्यासाठी 1168 मिमी व्यासाची नवी पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. ही लाईन सुरू करण्यासाठी इंदिरानगर नाका येथे 750 मिमी व्यासाच्या विद्यमान पाईपलाइनवर व्हॉल्व्ह लावणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील काही जलकुंभांपासून होणारा पुरवठा पूर्णपणे थांबवावा लागत आहे, असे TMCने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Mumbai Central Digital Lounge: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना मिळणार विमानतळासारख्या आधुनिक सुविधा; काय आहे रेल्वेची योजना?

कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार?

प्राप्त माहितीनुसार, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रूपादेवी जलकुंभ, रूपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येउर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ इत्यादी भागांना 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. 

पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता

महापालिकेने सांगितले आहे की, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस पाण्याचा दाब कमी राहू शकतो. नागरिकांनी पाणीकपातीच्या काळात पाणी साठवून ठेवावे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा.  

हेही वाचा – Mumbai Metro 3 Halted : गर्दीच्या वेळी दरवाज्यांनी दिला दगा, प्रवाशांना मनस्ताप; नेमकं काय घडलं?

यापूर्वी मुंबईत पाणीकपात

दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी बीएमसीने पाली हिल जलाशयातील व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी काम केले होते. यामुळे वांद्रे पश्चिम आणि खारमधील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी सोडण्यात आले होते. तसेच नागरिकांना काही दिवस पिण्याचे पाणी उकळूनच वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number