Virat Kohli: विराट कोहलीच्या चाहत्यांचा हिरमोड! ‘या’ कारणामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना

विराटला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. हा सामना प्रेक्षकांशिवाय 'रिकाम्या स्टेडियममध्ये' खेळवला जाणार आहे.<br/>

Virat Kohli: विराट कोहलीच्या चाहत्यांचा हिरमोड! ‘या’ कारणामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना

Virat Kohli: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये (विजय हजारे ट्रॉफी) परतत आहे. उद्या, 24 डिसेंबर रोजी दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश असा सामना बेंगळुरूच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, विराटला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. हा सामना प्रेक्षकांशिवाय 'रिकाम्या स्टेडियममध्ये' खेळवला जाणार आहे.

सरकारचा कठोर निर्णय; प्रेक्षकांना 'नो एन्ट्री'

कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (KSCA) स्पष्ट निर्देश दिले आहेत की, विजय हजारे ट्रॉफीचे सामने 'क्लोज्ड डोअर' (बंद दारांआड) आयोजित करावेत. स्टेडियममध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आणि दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy Squad: विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघात 'या' दोन खेळाडूंची सरप्राईज एन्ट्री

चेंगराचेंगरीच्या आठवणी आणि सुरक्षेचा प्रश्न

स्टेडियमबाबत हा कठोर निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे 4 जूनची चेंगराचेंगरीची घटना. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजय सोहळ्यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर भीषण चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्टेडियममध्ये अनेक सुधारणा आणि दुरुस्तीची कामे सुचवण्यात आली होती, जी अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यापूर्वी महिला विश्वचषकाचे सामनेही याच कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले होते.

हेही वाचा – Domestic Cricketer Pay: रणजी ते ज्युनिअर क्रिकेट; पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला खेळाडूंनाही समान मानधन

विराट-ऋषभ पंतची उपस्थिती आणि गोंधळाची भीती

या सामन्यात केवळ विराट कोहलीच नाही, तर ऋषभ पंत देखील दिल्लीकडून खेळणार आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि या दोन दिग्गज खेळाडूंची उपस्थिती यामुळे स्टेडियमबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून कोणताही धोका पत्करण्यास सरकार तयार नाही. पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी स्पष्ट केले की, स्टेडियमने अद्याप आवश्यक सुरक्षा मानकांची  पूर्तता केलेली नाही, त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number