Virat Kohli Statement on Trust : ‘माझे मूल्य वारंवार सिद्ध करावे लागत असेल तर…’; विराट कोहलीचे क्रिकेटमधील मानसिक दबावावर रोखठोक विधान!

आगामी 2027 च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची विराट कोहलीची तीव्र इच्छा आहे. मात्र, त्यासाठी परस्पर विश्वास आणि आदर मिळणे तितकेच गरजेचे असल्याचे तो मानतो.

Virat Kohli Statement on Trust : ‘माझे मूल्य वारंवार सिद्ध करावे लागत असेल तर…’; विराट कोहलीचे क्रिकेटमधील मानसिक दबावावर रोखठोक विधान!

Virat Kohli Shocking Statement on Team Trust : भारतीय क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाज विराट कोहली याने क्रिकेटमधील मानसिक दबाव आणि खेळाडूंच्या भवितव्यावर अत्यंत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ३७ वर्षीय कोहलीने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत संघाला माझी गरज आहे, तोपर्यंत मी स्वतःला पूर्ण ताकदीने झोकून देईन, असे सांगतानाच त्याने स्पष्ट केले की, जर कामगिरीच्या निकालांनुसार लोकांची भूमिका बदलणार असेल, तर अशा वातावरणात स्वतःहून बाजूला होणे मी पसंत करेन.

2027 विश्वकरंडक खेळण्याची तीव्र इच्छा, पण 'हा' आहे मुख्य अडथळा
आगामी 2027 च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची विराट कोहलीची तीव्र इच्छा आहे. मात्र, त्यासाठी परस्पर विश्वास आणि आदर मिळणे तितकेच गरजेचे असल्याचे तो मानतो. 'लोक मला वारंवार विचारतात की तुला 2027 च्या विश्वकरंडकात खेळायचे आहे का? अर्थातच मला देशासाठी खेळायला आवडेल, कारण तो कोणत्याही खेळाडूसाठी सर्वोच्च बहुमान असतो,' असे कोहली म्हणाला. परंतु, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अजूनही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.

"आधी विश्वास दाखवायचा आणि नंतर प्रश्न उपस्थित करायचे हे चुकीचे"
कामाच्या ठिकाणी सातत्य असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत विराटने क्रिकेटमधील वाढत्या दबावावर बोट ठेवले. "जर तुम्हाला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असेल तर तो कायम ठेवा, आणि नसेल तर पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी पुरेसा चांगला नाही," असा थेट सल्ला त्याने व्यवस्थापनाला दिला. आधी खेळाडूवर पूर्ण विश्वास दाखवायचा आणि नंतर काही सामन्यांच्या निकालांवरून त्याच्या कौशल्यावर आणि किंमतीवर प्रश्न उपस्थित करायचे, ही पद्धत योग्य नाही, अशा शब्दांत त्याने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

हेही वाचा – PBKS vs MI IPL 2026 : शेवटपर्यंत रंगला अटीतटीचा सामना; MI चा पंजाब किंग्सवर 6 गडी राखून विजय

फिटनेस आणि मैदानातील कठोर मेहनत हीच खरी ताकद
आपल्या कडक शिस्तीबद्दल बोलताना कोहलीने स्पष्ट केले की, त्याचा धावपळीचा आणि शिस्तबद्ध दिनक्रम केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून ती त्याची जगण्याची पद्धत आहे. तो म्हणाला, "मी 50 षटके क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वतःला नेहमी सज्ज ठेवतो. सीमारेषेवर 40 षटके इकडून तिकडे धावावे लागले तरी माझी तयारी असते, कारण मी त्यासाठी जिममध्ये प्रचंड घाम गाळतो." इतके सर्व प्रामाणिक प्रयत्न करूनही जर एखाद्या खेळाडूला प्रत्येक वेळी स्वतःचे अस्तित्व आणि मूल्य सिद्ध करावे लागत असेल, तर ती जागा आपल्यासाठी नाही, यावर तो ठाम आहे.

घरगुती क्रिकेटमधील पुनरागमन आणि 'लहान मुलासारखा' मिळालेला आनंद
जवळपास 2 दशकांनंतर 2025-26 च्या हंगामात विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून पुनरागमन करताना विराटने 2 सामने खेळले. मैदानावर प्रेक्षक नसतानाही एका सामन्यात शानदार शतक झळकावत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट प्रकारात सर्वात जलद 16 हजार धावांचा टप्पा पार केला. या अनुभवाबद्दल सांगताना तो म्हणाला की, मी कोणालाही काही सिद्ध करण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. जेव्हा मी केवळ खेळाचा आनंद घेण्याच्या दृष्टिकोनाने मैदानात उतरलो, तेव्हा मला पुन्हा एकदा एका लहान मुलासारखा निखळ आनंद मिळाला. जुलै 14 ते 19 दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदात मोठा बदल; IPL इतिहासात पाचव्यांदाच घडला 'असा' प्रसंग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number