Rashmika-Vijay Wedding: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात; ‘या’ खास ठिकाणी रंगणार शाही सोहळा

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा आता लग्नाच्या वळणावर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही सुपरस्टार 2026 मध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.<br/>

Rashmika-Vijay Wedding: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात; ‘या’ खास ठिकाणी रंगणार शाही सोहळा

Rashmika-Vijay Wedding: दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं आणि चर्चेत असलेलं जोडपं, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा आता लग्नाच्या वळणावर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही सुपरस्टार 2026 मध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. हे जोडपे 26 फेब्रुवारी 2026 रोजी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेऊ शकतात. विशेष म्हणजे, या शाही विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूर शहराची निवड करण्यात आली आहे. उदयपूरमधील एका ऐतिहासिक आणि भव्य वारसा राजवाड्यात (Heritage Palace) हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे समजते.

हेही वाचा – Suryakumar Yadav : "कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे, सूर्यकुमार यादव तर…" बोल्ड अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सूर्याकुमार यादव पुन्हा चर्चेत

दरम्यान, जरी हे लग्न राजस्थानच्या भव्य राजवाड्यात होणार असले, तरी हा सोहळा अत्यंत खासगी ठेवण्याचा या दोघांचा विचार आहे. केवळ कुटुंबातील सदस्य आणि मोजकेच जवळचे नातेवाईक या लग्नाला उपस्थित राहतील. ऑक्टोबर 2025 मध्ये या दोघांचा गुप्त साखरपुडा झाल्याचीही चर्चा रंगली होती. उदयपूरमधील अनेक ठिकाणांची पाहणी केल्यानंतर एका विशिष्ट पॅलेसवर त्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – Archana Patkar: दीड कोटींच्या खंडणी प्रकरणात सून अडकल्यानंतर अभिनेत्री अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या; 'अत्यंत प्रामाणिकपणे…'

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल किंवा लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील त्यांचे फोटो, सुट्ट्यांचे संकेत आणि कार्यक्रमांमधील त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते आधीच खुश आहेत. लग्नानंतर चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांसाठी एखादे भव्य रिसेप्शन आयोजित केले जाणार का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number