Heatwave Alert : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ‘या’ दोन दिवशी सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा गंभीर इशारा जारी

राजस्थानमधील प्रति-चक्रवाताचा प्रभाव आता महाराष्ट्राकडे सरकत असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्र होरपळून निघणार आहे.<br/>

Heatwave Alert : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ‘या’ दोन दिवशी सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा गंभीर इशारा जारी

Heatwave Alert : अवकाळी पावसाने दिलेल्या विश्रांतीनंतर आता राज्याच्या तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ होणार आहे. विदर्भात सूर्यदेवेचा कोप पाहायला मिळणार असून, विशेषतः 14 आणि 15 तारखेला उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानमधील प्रति-चक्रवाताचा प्रभाव आता महाराष्ट्राकडे सरकत असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्र होरपळून निघणार आहे.

विदर्भात 4 ते 5 अंशांनी पारा चढणार
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, सध्या कोणतीही मोसमी प्रणाली सक्रिय नसल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढणार आहे. काही ठिकाणी तापमान 2 ते 4 अंशांनी, तर काही जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 अंशांपर्यंत वाढू शकते. यामुळे येणारे दोन दिवस नागरिकांसाठी कष्टाचे ठरणार आहेत.

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 44 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने येथे 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. राजस्थानमधील प्रति-चक्रवातामुळे तिथे तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचले आहे. ही प्रणाली आता मध्य प्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने सरकत असल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा तीव्र होणार आहे.

नंदुरबारमध्ये उन्हाचा उच्चांक
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. येथे तापमानाने 45.5 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडले गेले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यात विशेष कक्ष (Heat Stroke Cell) कार्यान्वित केला आहे.

हेही वाचा – Nandurbar Fire News : आकाशात धुराचे लोट अन् नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसी कंपन्यांना भीषण आग; आगीच्या विळख्यात परिसर हादरला

प्रशासनाचे आवाहन
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी खालील दक्षता घ्यावी:
– दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.
-पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
– शेतकरी आणि बाहेर काम करणाऱ्या मजुरांनी कामाच्या वेळा बदलून उन्हापासून संरक्षण करावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number