Vasai Railway Accident: लोकल ट्रेनमधून फेकलेलं नारळ डोक्यात लागलं; वसईतील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

लोकल ट्रेनमधून फेकलेले नारळ डोक्यात लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. संजय भोईर (30 वय) असं या तरुणाचं नाव आहे. नारळ डोक्यात लागल्याने संजय गंभीर जखमी झाले होते.

Vasai Railway Accident: लोकल ट्रेनमधून फेकलेलं नारळ डोक्यात लागलं; वसईतील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Vasai Railway Accident: वसईमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत चालत्या लोकल ट्रेनमधून फेकलेले नारळ डोक्यात लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. संजय भोईर (30 वय) असं या तरुणाचं नाव आहे. नारळ डोक्यात लागल्याने संजय गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   

हेही वाचा – Shirdi Flood Accident: शिर्डीत मोटारसायकलस्वार चार युवक वाहून गेले; दोन ठार, साताऱ्यातही दुर्घटना

प्राप्त माहितीनुसार, संजय भोईर पांजू बेटातील रहिवासी असून ते सकाळी सुमारे 8:30 वाजता नायगाव स्टेशनकडे चालत जात होते. त्याच वेळी, कोणीतरी रेल्वेच्या खिडकीतून फेकलेल्या प्रसादातील नारळ त्यांच्या डोक्यावर आदळला. सुरुवातीला भोईर यांना वसईतील डीएम पेटिट रुग्णालयात दाखल केले गेले, नंतर पुढील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. तथापी, डोक्याला गंभीर दुखापत आणि रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा – CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा : पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत, तीन दिवस सतर्कतेचे निर्देश

या घटनेमुळे पांजू गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, वेगाने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून वस्तू फेकणे हा एक सामान्य प्रकार आहे. त्यामुळे अनेकदा पादचाऱ्यांना दुखापत होते. रेल्वे प्रशासन आणि नागरिकांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्या जाणार्‍या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. विशेषतः निर्माल्य, नारळ किंवा जुनी मूर्ती पुलावर पडल्यास पादचाऱ्यांना गंभीर जखमा होतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number