U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीची अफगाणिस्तानविरुद्ध दमदार खेळी; 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ठोकले अर्धशतक

अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 311 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीची अफगाणिस्तानविरुद्ध दमदार खेळी; 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ठोकले अर्धशतक

U19 World Cup 2026: 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 311 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याने केवळ 33 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.

विशाल लक्ष्याचा पाठलाग आणि वैभवचे वादळ
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारीत 50 षटकांत 4 गडी गमावून 310 धावांचा डोंगर उभा केला होता. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने भारताविरुद्ध 300 पेक्षा जास्त धावा केल्या. या आव्हानात्मक परिस्थितीत भारताला वेगवान सुरुवातीची गरज होती. वैभव सूर्यवंशीने ही जबाबदारी लीलया पेलत 206.06 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. आपल्या या खेळीत त्याने 9 चौकार आणि 4 नेत्रदीपक षटकार खेचले.

हेही वाचा – India vs Pakistan सामना होणार का? T20 विश्वचषकात भारताशी खेळण्यासाठी पाकिस्तानची 'ही' अट?

आरोन जॉर्जची साथ आणि कर्णधारावर भिस्त
वैभवने सलामीवीर आरोन जॉर्जसह पहिल्या विकेटसाठी अवघ्या 10 षटकांत 90 धावांची भागीदारी केली. यातील 68 धावा एकट्या वैभवच्या होत्या. शतकाकडे कूच करत असताना आक्रमक पवित्रा घेण्याच्या नादात वैभव बाद होऊन माघारी परतला. वैभवची ही खेळी भारताला विजयाच्या जवळ घेऊन जाणारी ठरली. सध्या भारताने 100 धावांचा टप्पा ओलांडला असून, कर्णधार आयुष आणि उर्वरित फलंदाज भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात यशस्वी होतात का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number