Biopic of V Shantaram: व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची घोषणा! चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारणार आयकॉनची भूमिका

व्ही. शांताराम या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.<br/>

Biopic of V Shantaram: व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची घोषणा! चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारणार आयकॉनची भूमिका

Biopic of V Shantaram: भारतीय चित्रपटसृष्टीचे धाडसी प्रयोगकर्ते आणि समाजमनाचा आवाज असलेले दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. व्ही. शांताराम या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्ही. शांताराम: भारतीय चित्रपटसृष्टीचे अग्रदूत

मूकपटांच्या काळापासून ते रंगीत सिनेमापर्यंत, शांताराम यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला प्रत्येक पावलावर नवी दिशा दिली. समाजातील प्रश्न, कडवी वास्तववादी मांडणी आणि कलात्मकतेचा सुरेख संगम ही त्यांची खासियत होती. नवरंग, झनक झनक पायल बाजे, दो आँखें बारह हाथ यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक भान निर्माण करणारा सिनेमा उभा केला. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले ‘बंडखोर’ दिग्दर्शक म्हणतात.

हेही वाचा – Dhurandhar Controversy : ‘धुरंधर’ वादावर हायकोर्टाचा निर्णय; CBFC ला ‘आर्म्ड फोर्सेस’चा सल्ला घेण्याचे निर्देश

सिद्धांत चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया 

सिद्धांत चतुर्वेदी यांनी ही भूमिका साकारणे हे स्वतःसाठी एक मोठे भाग्य आणि अत्यंत परिवर्तनकारी अनुभव असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘व्ही. शांताराम यांचे व्यक्तिमत्त्व जितके मोठे तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्ष, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या जिद्दीने मला खूप काही शिकवले. या भूमिकेमुळे मला चिकाटीचा आणि कलेबद्दल निष्ठेचा खरा अर्थ समजला.’ 

हेही वाचा – Mrunal Reaction On Dating Rumors : “ते बोलतात, आम्ही…” श्रेयस अय्यर की धनुष? डेटींगच्या अफवांवर मृणालच्या प्रतिक्रियेने चाहत्यांना बसला मोठा धक्का

निर्मात्यांची प्रतिक्रिया

निर्माते सुभाष काळे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीचे मजबूत स्तंभ आहेत. त्यांचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही हा चित्रपट तयार करत आहोत. सिद्धांत ही भूमिका अप्रतिमपणे साकारतील, याची आम्हाला खात्री आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number