नावापुढे पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी लावणे बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

उच्च न्यायालयात एका याचिकेची सुनावणी सुरू असताना, पक्षकार म्हणून डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर यांचे नाव &quotपद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर&quot असे नमूद करण्यात आले होते.

नावापुढे पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी लावणे बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

Padma Award Title : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा भारतरत्न हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत, मात्र त्या 'उपाधी' नाहीत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपल्या नावापूर्वी किंवा नंतर या शब्दांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही महत्त्वाची टिप्पणी केली. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

उच्च न्यायालयात एका याचिकेची सुनावणी सुरू असताना, पक्षकार म्हणून डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर यांचे नाव "पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर" असे नमूद करण्यात आले होते. डॉ. हर्डीकर यांना 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, केसच्या शीर्षकातच पुरस्काराचा उल्लेख केल्याचे पाहून न्यायालयाने आक्षेप घेतला आणि असा वापर करणे कायद्याने चुकीचे असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Mumbai Local Western Line : मुंबईकरांची लोकल कोंडी! पश्चिम रेल्वेवर उद्या 277 फेऱ्या रद्द; बोरीवली पट्ट्यात तब्बल 5 दिवसांचा मोठा ब्लॉक

सर्वोच्च न्यायालयाचा 'तो' ऐतिहासिक निर्णय

न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी आपल्या निरीक्षणात 1995 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार हे सन्मान आहेत, त्या ब्रिटीशकालीन 'सर' किंवा 'रायबहादूर' सारख्या पदव्या नाहीत. संविधानाच्या नियमांनुसार, हे पुरस्कार नावाचा भाग म्हणून वापरणे चुकीचे आहे. हा नियम कलम 141 अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना आणि न्यायालयांना बंधनकारक आहे.

हेही वाचा – Dagdi Chawl Politics : महापालिका निवडणुकीसाठी डॅडींच्या दोन्ही कन्या मैदानात; काकी विरुद्ध पुतणी असा रंगणार भायखळ्यात हायव्होल्टेज सामना

पद्म पुरस्कारांची थोडक्यात माहिती

देशात 1954 पासून या नागरी पुरस्कारांची सुरुवात झाली. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असून एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. तथापी, पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान आहे. तसेच पद्मभूषण हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान आहे. याशिवाय, पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान आहे.  दरम्यान, 2025 मध्ये एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले (7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री). यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू आर. अश्विनसह 71 व्यक्तींचा समावेश होता. एका वर्षात मरणोत्तर आणि परदेशी नागरिक वगळता जास्तीत जास्त 120 पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number