Iran War Cost US: इराणसोबतच्या युद्धाची अमेरिकेला मोजावी लागतेय मोठी किंमत; युद्धाच्या आगीत देशाच्या पैशाची राखरांगोळी

युद्धाचा वाढता खर्च पाहता, व्हाईट हाऊस लवकरच अमेरिकन काँग्रेसकडे अतिरिक्त निधीची मागणी करू शकते. युद्ध लांबल्यास त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक शेअर बाजारावर होईल.

Iran War Cost US: इराणसोबतच्या युद्धाची अमेरिकेला मोजावी लागतेय मोठी किंमत; युद्धाच्या आगीत देशाच्या पैशाची राखरांगोळी

Iran War Cost America: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले असे वाटत असतानाच या संघर्षाचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे, हेही समोर आले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ठेवलेल्या आकडेवारीनुसार, युद्धाच्या पहिल्या अवघ्या 6 दिवसांत अमेरिकेने तब्बल 11.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र साठ्यात वेगाने घट होत असल्याने सिनेटर्सनी चिंता व्यक्त केली आहे.

शस्त्रास्त्रे आणि लष्करी मोहिमेवर प्रचंड खर्च
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या पहिल्या 2 दिवसांतच अमेरिकेने 5.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 51,000 कोटी रुपये) किमतीच्या दारुगोळ्याचा वापर केला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले होते. तेव्हापासून आज युद्ध 13 व्या दिवसात प्रवेश करत असताना, खर्चाचा आकडा वेगाने वाढत आहे. अमेरिकेचे संरक्षण क्षेत्र आधीच मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असताना, या युद्धामुळे शस्त्रास्त्रांच्या तुटवड्याची भीती निर्माण झाली आहे.

युद्धात आतापर्यंत 2,000 हून अधिक मृत्यू
या भीषण संघर्षात आतापर्यंत 2,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये प्रामुख्याने इराण आणि लेबनॉनच्या नागरिकांचा समावेश आहे. मध्यपूर्वेतील हा संघर्ष आता लेबनॉनपर्यंत विस्तारला असून, त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि एलपीजी (LPG) संकटामुळे जगभरातील देश या युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण युद्ध आधीच जिंकले असल्याचा दावा केला असला, तरी मोहिमेचा शेवट कधी होईल, याची कोणतीही निश्चित कालमर्यादा प्रशासनाने दिलेली नाही.

हेही वाचा – PM Narendra Modi: होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजे अडकली? इराणच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींची थेट चर्चा, काय घडलं?

50 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची शक्यता
युद्धाचा वाढता खर्च पाहता, व्हाईट हाऊस लवकरच अमेरिकन काँग्रेसकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हा आगामी निधी विनंतीचा आकडा 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. अमेरिकन संसदेच्या सदस्यांनी लष्करी मोहिमेच्या आर्थिक आणि धोरणात्मक परिणामांवर अधिक माहिती मागवली आहे. युद्ध लांबल्यास त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक शेअर बाजारावर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जागतिक तणाव आणि आर्थिक संकट
इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ हे दोन देशच नाही, तर संपूर्ण जग आर्थिक संकटाच्या छायेत आहे. इंधनाचा तुटवडा आणि वाहतुकीचे विसकळीत झालेले जाळे यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेसाठी हे युद्ध केवळ लष्करी नसून मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. ट्रम्प प्रशासन ही लढाई पूर्ण करण्यासाठी ठाम असले, तरी देशांतर्गत वाढता विरोध आणि रिकामे होत चाललेले लष्करी कोठार ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हेही वाचा – US-Iran War : इराण अमेरिकेवर थेट हल्ला करणार? 'FBI' कडून 'हा' इशारा; समुद्रकिनारी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number