Upendra Dwivedi’s Warning to Pakistan: यावेळी सोडणार नाही…; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा

या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानसंदर्भात कडक इशारा देत म्हटले की, जर पाकिस्ताने दहशतवादास पाठिंबा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जाऊ शकते.

Upendra Dwivedi’s Warning to Pakistan: यावेळी सोडणार नाही…; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा

Upendra Dwivedi's Warning to Pakistan: भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी राजस्थानच्या श्री गंगानगरजवळील घडसाणा येथील 22 एमडी गावाच्या सीमावर्ती भागाला भेट देऊन सीमावर्ती सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या तयारीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानसंदर्भात कडक इशारा देत म्हटले की, जर पाकिस्ताने दहशतवादास पाठिंबा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूर 1.0 चा प्रभाव आणि यश जगाला स्पष्ट झाले आहे. यावेळी आम्ही पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही. जर पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे थांबवले नाही तर ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाऊ शकतो, असंही द्विवेदी यांनी म्हटलं आहे. 

लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूर 1.0 संदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले की, त्या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी आणि सैनिक मारले गेले आणि विविध रडार, कमांड-कंट्रोल केंद्रे, रनवे व हँगर्सचे मोठे नुकसान झाले. त्यांनी यशाचे श्रेय लष्करी जवानांना आणि स्थानिक लोकांना दिले.

हेही वाचा – PM Modi Announcing New Education Schemes: पंतप्रधान मोदींकडून 62 हजार कोटींच्या योजनांची घोषणा; बिहारवर विशेष लक्ष

दरम्यान, त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा देशातील कोणतीही महिला तिच्या कपाळावर सिंदूर लावते तेव्हा तिला ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याची आठवण येते. तथापी, लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय यंत्रणांनी लक्षित धोरण आखले होते. आम्हाला निष्पाप लोक आणि परंपरागत लष्करी पाया लक्ष्य करायचा नव्हता. आमचे उद्दिष्ट फक्त दहशतवादी अड्डे, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रा आणि तज्ज्ञ संघटना यांना नष्ट करणे होते. त्यानुसारच भारताने ‘निश्‍चित आणि अचूक’ हल्ले केले आहेत, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – Operation Sindoor: भारताने F-16 आणि JF-17 विमानांसह 4 ते 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा मोठा खुलासा

यावेळी, ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या तीन सेवा अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला. बीएसएफच्या 140 व्या बटालियनचे कमांडंट प्रभाकर सिंग, राजपूताना रायफल्सचे मेजर रितेश कुमार आणि हवालदार मोहित गेरा यांना गौरव करण्यात आला. लष्करप्रमुखांनी शेवटी सैनिकांना आणि यंत्रणांना आवाहन केले की वर्तमान परिस्थितीत सर्वांनी पूर्ण तयारी ठेवावी. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number