Budget Session 2026 : संसदेत अभूतपूर्व गोंधळ; सभापतींच्या खुर्चीवर कागदपत्रे फेकल्याने 8 विरोधी खासदार निलंबित

सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे फेकल्याच्या आरोपावरून आठ विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Budget Session 2026 : संसदेत अभूतपूर्व गोंधळ; सभापतींच्या खुर्चीवर कागदपत्रे फेकल्याने 8 विरोधी खासदार निलंबित

Budget Session 2026: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे फेकल्याच्या आरोपावरून आठ विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर विरोधकांनी संसदेबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

नेमकी कारवाई आणि खासदारांची नावे
लोकसभेच्या कामकाजादरम्यान काही खासदारांनी दोनदा सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. या शिस्तभंगामुळे सभापतींनी नियम 374(2) अंतर्गत कारवाई करत पुढील आठ खासदारांना निलंबित केले:

अमरिंदर सिंग राजा वारिंग
हिबी एडन
माणिकम टागोर बी.
गुरजीत सिंग औजला
प्रशांत यादवराव पडोळे
किरण कुमार रेड्डी
एस. वेंकटेशन
डीन कुरियाकोसे

हेही वाचा – India US Tariff Deal: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण भारतासाठी ‘अग्निपरीक्षा’; ‘ही’ अट मान्य केल्यानंतरच मिळणार संपूर्ण दिलासा

विरोधकांचा वॉकआउट आणि निषेध
निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी खासदारांनी सभागृहातून सभात्याग (वॉकआउट) केला. संसद संकुलात झालेल्या या निषेध आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा देखील सहभागी झाले होते. यावेळी खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “ही एक हास्यास्पद कृती आहे. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले म्हणणे मांडण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार असला पाहिजे.”

सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल: ‘मर्यादा ओलांडली’
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. “आज विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. महासचिवांच्या टेबलावर चढून कागदपत्रे फाडणे ही अत्यंत वाईट वृत्ती आहे. कदाचित या लोकांचा असा समज आहे की केवळ गांधी कुटुंबातील सदस्यच राज्य करू शकतात. सभागृह हे शिस्तीने आणि नियमानेच चालेल, अनुशासनहीनतेने नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number