जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राज्य ढवळून निघाल आहे. शेतकऱ्यांनी संप करुन दाखवला. रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
राज्य सरकारने आपण कर्जमाफीसाठी अनुकूल असल्याचं सांगितले. पण, आता या सर्वात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करत उद्धव ठाकरे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. 15 जूनपासून उद्धव ठाकरे कर्जमुक्तीसाठी दौरा करतील.
यात मराठवाडा-विदर्भ आणि खानदेशाचा समावेश आहे. भाजपच्या कर्जमुक्ती खेळीनं शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखच मैदानात उतरले आहेत. एकीकडे भाजप स्वबळावर लढण्याची भाषा बोलत असताना शिवसेनाही निवडणुकीची चाचपणी करत आहे.
जिल्हा प्रमुखांना तयारीला लागा अशा सुचनाही उद्धव ठाकरेंकडून मिळाल्या असल्याचं समजते.