Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. इडाईकलजवळील कामराजपूरम परिसरात दोन खाजगी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतरचे व्हिडिओ समोर आले असून, बचाव पथक बुलडोझरच्या मदतीने बसचे अवशेष हटवताना दिसत आहे.
अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, यातील एक बस मदुराईहून तेनकासीच्या दिशेने येत होती, तर दुसरी बस कडायनाल्लूरकडे जात होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अपघाताचा सविस्तर तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – Tragic Family Incident: ‘देव आम्हाला बोलवत आहे’; एकाच कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिले तातडीचे आदेश
राज्यातील या गंभीर अपघातावर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांच्याशी तातडीने संपर्क साधत घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. स्टॅलिन यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही फोनवरून सूचना दिल्या की सर्व जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात यावी.
தென்காசி கடையநல்லூரில் நேர்ந்த பேருந்து விபத்தில் ஆறு பேர் உயிரிழந்த செய்தியறிந்து மிகவும் வேதனைக்குள்ளாகியிருக்கிறேன். உடனடியாக, மாவட்டப் பொறுப்பு அமைச்சரான @KKSSRR_DMK அவர்களைத் தொடர்புகொண்டு, சம்பவ இடத்திற்கு விரைந்து செல்ல அறிவுறுத்தியுள்ளேன். விபத்து நேர்ந்த இடத்திலிருந்து… — M.K.Stalin – தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) November 24, 2025
हेही वाचा – Justice Surya Kant Takes Oath : राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
स्टॅलिन यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, ‘तेनाकसी-कडायनल्लूर येथे झालेल्या भीषण बस अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याने अत्यंत दु:ख झाले. जिल्हा प्रशासनाला घटनास्थळी तातडीने पोहोचून बचावकार्य गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. सरकार जखमींच्या जलद उपचारासाठी प्रयत्नशील आहे.’ या अपघातामुळे तेनकासी परिसरात शोककळा पसरली असून रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.