काटकसरीचा तडाखा लावणाऱ्या तुकाराम मुंढेंचं घर भाडं 95 हजार रुपये

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले पुण्याच्या PMPML चे अध्यक्ष तुकाराम मुंडे चांगलेच अडचणीत आलेत. तुकाराम मुंढे राहत असलेल्या घराचं भाडं महिन्याला तब्बल 95 हजार रुपये असल्याची माहिती समोर आलीय. एकीकडे काटकसर आणि शिस्तीच्या नावाखाली अनेकांना कामावरून घरी बसवण्याचा तडाखा मुंढेंनी लावला असताना. एवढ्या महागाचं घर कशासाठी हा प्रश्न पुणेकरांच्या मनात […]

काटकसरीचा तडाखा लावणाऱ्या तुकाराम मुंढेंचं घर भाडं 95 हजार रुपये

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले पुण्याच्या PMPML चे अध्यक्ष तुकाराम मुंडे चांगलेच अडचणीत आलेत.

तुकाराम मुंढे राहत असलेल्या घराचं भाडं महिन्याला तब्बल 95 हजार रुपये असल्याची माहिती समोर आलीय. एकीकडे काटकसर आणि शिस्तीच्या नावाखाली अनेकांना कामावरून घरी बसवण्याचा तडाखा मुंढेंनी लावला असताना.

एवढ्या महागाचं घर कशासाठी हा प्रश्न पुणेकरांच्या मनात डोकावतोय. PMPML ची सूत्र हाती घेतल्यापासून मुंढेंनी कारवाईचा धडाका लावलाय.

मात्र, स्वतः मुंढे 4 हजार स्क्वेअर फुटच्या अलिशान फ्लॅटमध्ये 3 जणांचं कुटूंब घेऊन राहताहेत, याला आक्षेप घेतला जातोय.

शिवाय हा प्रकार म्हणजे दुटप्पीपणा असल्याचं सांगत काँग्रेसनं मुंढेंवर निशाणा साधलाय, तर पदाला साजेसं घर असल्याचं सांगत मुंढे या गोष्टीचं समर्थन करताहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number