Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या कथित विकिपीडिया स्क्रीनशॉटमध्ये त्यांचे अधिकृत फोटो दिसत आहेत. त्याखाली त्यांचे पद 'Acting President of..

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात खळबळ

Trump Truth Social Media Post : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) प्लॅटफॉर्मवर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते स्वतःला व्हेनेझुएलाचे ‘कार्यवाह राष्ट्राध्यक्ष’ (Acting President) म्हणून संबोधित करत आहेत. या पोस्टमध्ये विकिपीडियाच्या पेजसारखा दिसणारा एक डिजीटल फोटो असून, त्यावर “इन्कंबंट जानेवारी 2026” (Incumbent January 2026) असा उल्लेख करण्यात आला आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी खरोखरच व्हेनेझुएलाचा ताबा घेतला आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

नेमकी काय आहे ही पोस्ट?
डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या कथित विकिपीडिया स्क्रीनशॉटमध्ये त्यांचे अधिकृत फोटो दिसत आहेत. त्याखाली त्यांचे पद ‘Acting President of Venezuela’ असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे आणि 47 वे राष्ट्राध्यक्ष असून त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्याचाही उल्लेख आहे. तसेच, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचेही नाव या पेजवर दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल होताच राजकीय विश्लेषकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे, कारण तांत्रिकदृष्ट्या व्हेनेझुएलाचे शासन सध्या तिथे नेमलेल्या अंतरिम प्रमुखांकडे आहे.

निकोलस मादुरो यांची अटक आणि अमेरिकन मोहीम
या सर्व घडामोडींच्या मागे 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकन सैन्याने राबवलेली एक अत्यंत गुप्त आणि मोठी मोहीम आहे. अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना त्यांच्याच देशातून अटक केली. या कारवाईनंतर त्यांना तातडीने न्यूयॉर्कला नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलामध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली असून, तिथे डेल्सी रॉड्रिग्ज यांची अंतरिम सरकार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – India Pakistan Relation: रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते, मग भारतीय सैन्याने असं काही केलं की…

नैसर्गिक संसाधनांवर अमेरिकेचा ‘डोळा’?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत या मोहिमेमागची भूमिका अधिक स्पष्ट केली. त्यांच्या मते, मादुरो यांच्या अटकेमुळे अमेरिकन नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. व्हेनेझुएलातील अफाट नैसर्गिक संसाधने आणि विशेषतः कच्च्या तेलाचा साठा आता अमेरिकेच्या धोरणांनुसार वापरता येईल. यामुळे अमेरिकन नागरिकांना स्वस्त दरात ऊर्जा उपलब्ध होईल, असा दावा व्हान्स यांनी केला आहे. “आमच्या विरोधात जाण्याची हिंमत भविष्यात कोणीही करणार नाही,” असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कायदेशीर बाजू आणि आंतरराष्ट्रीय पडसाद
ट्रम्प यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचे प्रमुख घोषित केले असले तरी, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे कितपत वैध आहे, यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरी अमेरिकेने मादुरो यांना हटवले असले, तरी परकीय राष्ट्राध्यक्षाने दुसऱ्या देशाचा कार्यभार स्वतःच्या नावावर जाहीर करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या दुर्मिळ आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच म्हटले होते की, अमेरिका सध्या व्हेनेझुएला ‘चालवत’ (Run) आहे आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत तेच तिथे लक्ष देतील. मात्र, ‘कार्यवाह राष्ट्राध्यक्ष’ ही पदवी ट्रम्प यांनी स्वतःहून लावून घेतल्याने मित्र राष्ट्र आणि विरोधकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा – Mysterious Virus Outbreak: उच्च ताप, अंगावर लाल डाग… त्वचा सोलणाऱ्या गूढ विषाणूमुळे हाहाकार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number