Amravati Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; कार अन् ट्रकच्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

Amravati Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; कार अन् ट्रकच्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

Amravati Accident:  समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत हे चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Rajgad accident: मुसळधार पाऊस आणि किर्र अंधारात किंचाळ्यांचा थरार! राजगडावर निघालेली ट्रॅव्हल्स दरीत कोसळली; 20 पैकी 18 जण…

भरधाव वेग ठरला जीवघेणा; मृतांमध्ये लहान मुलीसह दोन महिलांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने अतिशय भरधाव वेगाने जात होती. यादरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट समोरील ट्रकला जाऊन जोरदार धडकली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 5 जणांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका निष्पाप लहान मुलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन मदत यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांच्या थेट नियंत्रणाची मागणी
समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या या जीवघेण्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या गतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु तरीही वाहनचालकांकडून वेगाच्या मर्यादांचे उल्लंघन होताना दिसत आहे. केवळ कॅमेऱ्यांवर विसंबून न राहता पोलिसांनी स्वतः प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहनांच्या भरधाव वेगावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number