Road Accident: अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पिकअप आणि ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी

एक ट्रक आणि पिकअप गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Road Accident: अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पिकअप आणि ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी

Road Accident:  पंजाबमधील फिरोजपूर-फाझिल्का मार्गावर शनिवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. एक ट्रक आणि पिकअप गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात फिरोजपूर-फाझिल्का महामार्गावरील ‘जंगा वाला’ गावाजवळ झाला. धडक इतकी भीषण होती की पिकअप जीपमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जणांनी उपचारादरम्यान जीव गमावला. या पिकअप जीपमधून सुमारे 25 लोक प्रवास करत होते, जे गाडीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मृत आणि जखमी व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बळी पडलेले आणि जखमी झालेले सर्वजण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. हे सर्वजण जलालाबाद येथील रहिवासी असून, त्यांच्या एका दिवंगत नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी बियास येथील ‘डेरा राधा स्वामी’कडे निघाले होते. एकाच कुटुंबातील आणि नात्यातील लोकांवर काळाने असा घाला घातल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि जलालाबाद शहरात तीव्र शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – India GDP Growth : आर्थिक महासत्तांच्या शर्यतीत भारताची घोडदौड! 2060 पर्यंत चीनला मागे टाकणार; मात्र, स्वप्नपूर्तीमध्ये हा मोठा अडथळा

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त पिकअप गाडीत एकूण 25 प्रवासी होते, ज्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने फिरोजपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी ज्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी फरीदकोट येथील गुरु गोविंद सिंग मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number