टायगरला जिंदा ठेवण्यासाठी देवाचा बळी दिला जातोय का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मल्टिप्लेक्समध्ये पुन्हा एकदा मराठी सिनेमांना प्राईमटाईम मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. सलमानचा खानचा टायगर आणि अंकुश चौधरीचा देवा एकाच दिवशी प्रदर्शित होतोय. मात्र मराठी सिनेमाला  मल्टिप्लेक्सने प्राईमटाईम नाकारलाय. याविरोधात मनसे, शिवसेना, स्वाभिमान पक्ष आक्रमक झाली आहे. त्यामुळे टायगरला जिंदा ठेवण्यासाठी देवाचा बळी दिला जातोय का? मराठी चित्रपटांना प्राइम टाइम […]

टायगरला जिंदा ठेवण्यासाठी देवाचा बळी दिला जातोय का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मल्टिप्लेक्समध्ये पुन्हा एकदा मराठी सिनेमांना प्राईमटाईम मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. सलमानचा खानचा टायगर आणि अंकुश चौधरीचा देवा एकाच दिवशी प्रदर्शित होतोय. मात्र मराठी सिनेमाला  मल्टिप्लेक्सने प्राईमटाईम नाकारलाय. याविरोधात मनसे, शिवसेना, स्वाभिमान पक्ष आक्रमक झाली आहे. त्यामुळे टायगरला जिंदा ठेवण्यासाठी देवाचा बळी दिला जातोय का?

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 22 डिसेंबरला अभिनेता सलमान खानचा टायगर जिंदा है आणि अंकुश चौधरीचा देवा एकाच दिवशी प्रदर्शित होतोय. मात्र देवाला प्राईमटाईम द्यायला मल्टिप्लेक्सनी नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे, स्वाभिमान या राजकीय पक्षांसह कलाकारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी पत्रकार परिषद घेऊन यशराज फिल्मसवर निशाणा साधला. महाराष्ट्रात हिंदी निर्मात्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

तर, आमदार नितेश राणेंनी महाराष्ट्रात ‘देवा’ला मारुन ‘टायगर..’ जिवंत राहत असेल तर त्या थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही, असं ट्विट करत त्यांनी चित्रपटगृहाच्या मालकांना इशारा दिलाय.

तर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी चित्रपटगृहांच्या मालकांविरुद्धची मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असं ट्विटच केलंय. या राजकीय आक्रमक भूमिकेनंतर ज्येष्ठ नेते नाना पाटेकरांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपटगृहांवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number