वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हरियाणाचे सुपुत्र कपिल कुंडू जम्मू काश्मिरमधील हल्ल्यात शहीद झाले. कॅप्टन या पदावर ते कार्यरत होते. पाकिस्तानकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यात त्याना वीरगती प्राप्त झाली. कॅप्टन कपिल कुंडू हे येत्या10 फेब्रुवारीला आपल्या वयाची 23 वर्ष पूर्ण करणार होते. अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांच बलिदान दिले देशासाठी केले.
2012 मध्ये कॅप्टन कपिल कुंडू एनडीएमध्ये रुजू झाले. एनडीएच्या माध्यमातून ते सैन्यात दाखल झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कॅप्टन कुंडू राजौरीमध्ये तैनात होते. तेमूळ हरियाणातील गुरुग्रामचे ते रहिवासी होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हे आईंचे म्हणजेच सुनिता यांचा आधार बनले. त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. कपिल यांनी बलिदान दिल्यामुळे कुंडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला होता . यात कॅप्टन कपिल कुंडूंसह चार जवान शहीद झाले तर, दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत.
नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार झाला व जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल शहीद झाले, तर लान्स नायक इक्बाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले. या वर्षाच्या सुरुवाती पासूनच नव्हेतर सतत पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.