यंदाच्या गणोशोत्सवात 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई सर्वांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सव मंडळांची तयारीही जोरदार सुरू आहे. मात्र महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमांमुळे या मंडळांवर अनेक निर्बंध आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर होणारं ध्वनीप्रदूषण हा नेहमीच वादाचा मुद्दा बनतो. उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. तसेच डी.जे, डॉल्बी यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. […]

यंदाच्या गणोशोत्सवात 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

सर्वांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सव मंडळांची तयारीही जोरदार सुरू आहे. मात्र महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमांमुळे या मंडळांवर अनेक निर्बंध आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर होणारं ध्वनीप्रदूषण हा नेहमीच वादाचा मुद्दा बनतो.

उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. तसेच डी.जे, डॉल्बी यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. याचा विचार करून ध्वनीक्षेपकांनाही रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी असते. 

मात्र यावर्षी गणोशोत्सात सर्वांसाठी एक आंनदाची बातमी आहे. ती म्हणजे या गणोशोत्सवात काही ठराविक दिवसांत 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात 14,17, 22, 23 या 4 दिवसांमध्ये सर्व गणेशमंडळांना 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसंच दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल ध्वनीक्षेपक वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गणेशोत्सव समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ज्या मंडळांना गेल्यावर्षी परवानगी मिळाली होती. त्यांना यावर्षीही परवानगी दिली जाणार आहे.

त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी ध्वनीक्षेपकाच्या परवानगीसाठी एकखिडकी योजना राबविण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number