Aircraft Accidents In India: देशात गेल्या 5 वर्षांत ‘इतके’ विमान अपघात; मुरलीधर मोहोळ यांची संसदेत खळबळजनक माहिती

गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातांचे प्रमाण दर 10,000 उड्डाण तासांमागे 0.53 इतके नोंदवले गेले. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे.

Aircraft Accidents In India: देशात गेल्या 5 वर्षांत ‘इतके’ विमान अपघात; मुरलीधर मोहोळ यांची संसदेत खळबळजनक माहिती

Aircraft Accidents In India: केंद्र सरकारने सोमवारी संसदेत देशातील विमान अपघातांबाबतची महत्त्वाची आकडेवारी सादर केली आहे. गेल्या 5 वर्षांत एकूण 23 विमाने आणि हेलिकॉप्टर्सना अपघात झाल्याची माहिती नागरी विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली. यामध्ये हेलिकॉप्टर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे.

हेलिकॉप्टर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक
सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातांचे प्रमाण दर 10,000 उड्डाण तासांमागे 0.53 इतके नोंदवले गेले. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे. तसेच, 'नॉन-शेड्युल्ड' (अनियमित) विमानांच्या बाबतीत हे प्रमाण दर 10,000 उड्डाणांमागे 0.27 इतके राहिले आहे. विमान सुरक्षेच्या दृष्टीने ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

वर्षनिहाय अपघातांचा तपशील
2021: 06 अपघात
2022: 04 अपघात
2023: 04 अपघात
2024: 03 अपघात
2025: 06 अपघात (यात 4 हेलिकॉप्टर अपघातांचा समावेश आहे)

DGCA मध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता
नागरी विमानन महासंचालनालयामध्ये (DGCA) मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. मंजूर असलेल्या 1,630 पदांपैकी 780 हून अधिक पदे अद्याप भरलेली नाहीत. मात्र, या कमतरतेचा विमान सुरक्षेवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी नियामक संस्थेकडे एक भक्कम यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Prayagraj News : प्रयागराजमध्ये मोठी दुर्घटना! कोल्ड स्टोरेज इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

भरती प्रक्रियेला वेग; नवीन नियुक्ती सुरू
रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यांत 167 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी 106 जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. तसेच, वर्ष 2026 साठी विविध तांत्रिक संवर्गातील 82 पदांच्या थेट भरतीचे प्रस्ताव सध्या प्रक्रियाधीन आहेत. तातडीची गरज म्हणून काही पदे कंत्राटी पद्धतीनेही भरली जात आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number