Usman Hadi Death Case: उस्मान हादी मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; मुख्य आरोपीचा दुबईतून व्हिडिओ जारी, बांगलादेशचा ‘भारत’ कनेक्शनचा दावा फोल

या कृत्यामागे भारताचा हात असल्याचा आणि आरोपी भारतात पळाल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेश सरकारला मोठा धक्का बसला आहे.

Usman Hadi Death Case: उस्मान हादी मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; मुख्य आरोपीचा दुबईतून व्हिडिओ जारी, बांगलादेशचा ‘भारत’ कनेक्शनचा दावा फोल

Usman Hadi Death Case: बांगलादेशातील कट्टर भारतविरोधी विद्यार्थी नेता उस्मान हादी याच्या मृत्यूचे गूढ आता अधिक गडद झाले आहे. या कृत्यामागे भारताचा हात असल्याचा आणि आरोपी भारतात पळाल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेश सरकारला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित फैसल करीम मसूद याने थेट दुबईतून एक व्हिडिओ प्रसिद्ध करत बांगलादेशच्या दाव्यांतील हवा काढून घेतली आहे.

बांगलादेशचे आरोप आणि हिंसाचार

काही आठवड्यांपूर्वी उस्मान हादीची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बांगलादेशातील सत्ताधारी आणि तपास यंत्रणांनी तपासाची सुई भारताकडे वळवली होती. भारतानेच हे कृत्य केल्याचा कांगावा करत बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करून मोठा हिंसाचार घडवून आणला गेला. मारेकरी भारतीय सीमेवरून पसार झाले आणि त्यांना भारतीयांनीच मदत केली, असा खोटा दावाही तेथील प्रशासनाने केला होता. मात्र, भारताने हे सर्व आरोप आधीच फेटाळून लावले होते.

हेही वाचा – Saudi Arabia Airstrike : अरब जगतात ठिणगी! सौदीचा मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला; UAE कडून सैन्य माघारीची घोषणा

'दुबई' कनेक्शनने बांगलादेश तोंडघशी

पोलीस तपासात मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला फैसल करीम मसूद सध्या दुबईत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईतून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, "उस्मान हादीच्या हत्येशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून मला विनाकारण बळीचा बकरा बनवले जात आहे." मसूदने पुढे स्पष्ट केले की, हादीसोबत त्याचे केवळ व्यावसायिक संबंध होते आणि तो कोणत्याही कायदेशीर चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.

हेही वाचा – India Imposed Tariff: आता झुकेल चीन! भारतीय बाजारपेठेत डम्पिंग करणाऱ्यांना भारताने शिकवला धडा

तपासावर प्रश्नचिन्ह

मसूदच्या या दाव्यामुळे बांगलादेशच्या तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या प्रभावाखाली असलेल्या बांगलादेशने या हत्येचा वापर भारतविरोधी वातावरण निर्मितीसाठी केल्याचे आता उघड होत आहे. दरम्यान, बांगलादेश पोलिसांनी मसूदच्या दाव्यावर संशय व्यक्त केला असून, त्याला दुबईतून ताब्यात घेण्यासाठी प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number