Donald Trump warning: जगभरात आधीच युद्धाचे ढग दाटलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या युद्धाची ठिणगी टाकली आहे. इराणसोबतचा संघर्ष अद्याप शमला नसतानाच, ट्रम्प यांनी आता थेट क्यूबा या देशावर लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेण्याची खळबळजनक घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शांतता धोक्यात आली आहे.
इराण युद्धात अमेरिका अडकली?
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. काही आठवड्यांत हे युद्ध संपेल असा अमेरिकेचा अंदाज होता, मात्र इराणने दिलेल्या कडव्या प्रतिकारामुळे वॉशिंग्टनवर दबाव वाढला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत युद्धातील नुकसानीची पूर्ण भरपाई मिळत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही. आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर इराणकडून सातत्याने हल्ले होत असल्याने पेंटागॉनची चिंता वाढली आहे.
अमेरिकेचा आता 'क्यूबा'वर निशाणा
इराणशी दोन हात करत असतानाच ट्रम्प यांनी आपला मोर्चा क्यूबाकडे वळवला आहे. फ्लोरिडापासून अवघ्या 170 किलोमीटर अंतरावर असलेल्या या चिमुकल्या देशाची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 10 लाख आहे. गेल्या 67 वर्षांपासून अमेरिकेच्या 13 राष्ट्राध्यक्षांनी क्यूबावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश आले नाही. आता ट्रम्प यांनी हा देश हस्तगत करण्याचा विडा उचलला आहे.
क्यूबाचा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर एवढा भीषण परिणाम झाला आहे की, क्यूबाचा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सध्या संपूर्ण क्यूबा अंधारात बुडालेला असून तिथे वीज, गॅस आणि इतर इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. क्यूबा हा देश चिनी कॉफी, नैसर्गिक संसाधने आणि मौल्यवान खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. याच साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका ही खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या या एका घोषणेमुळे रशिया आणि चीनसारख्या महासत्तांची भूमिका काय असेल, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.