Pune Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावरील अपघाताची मालिका काही थांबेना! अपघातानंतर वाहनांना आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू; वाहतूक ठप्प

अपघातानंतर दोन ते तीन वाहनांना अचानक पेट घेतला. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

Pune Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावरील अपघाताची मालिका काही थांबेना! अपघातानंतर वाहनांना आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू; वाहतूक ठप्प

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर वीसहून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर दोन ते तीन वाहनांना अचानक पेट घेतला. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नवले ब्रीजवर 3 ते 4 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. त्यानंतर एका कारला आग लागून ती काही क्षणांतच ज्वाळांनी वेढली गेली. या कारमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य प्रवास करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही काळासाठी या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या 'या' निर्णयामुळे पवार गटाची डोकेदुखी गेली

या अपघातामुळे पुन्हा एकदा नवले पुलावरील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून नागरिकांनी यापूर्वीही वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाला अनेकदा इशारा दिला होता. मात्र ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

हेही वाचा – HC On Alimony Case: हजारो कोटींचा मालक, पण पोटगीसाठी गरीब असल्याचा दावा; कोर्टाने दिला मोठा दणका

दरम्यान, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी या घटनेनंतर प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले, 'फक्त कॅमेरे बसवून आणि वाहतूक नियंत्रणाचे बोर्ड लावून समस्या सुटत नाही. स्पीड मॉनिटरिंग, सुरक्षा व्यवस्था आणि रस्त्याच्या उताराच्या रचनेवरही लक्ष देणं गरजेचं आहे. एनएचएआयचा हा भोंगळ कारभार असून अपघातानंतर केवळ पाहणी दौरे होत राहतात.' दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून नवले ब्रीजवरील कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आवाज उठू लागला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number