Mahadev Munde Case: महादेव मुंडे मृत्यू प्रकरणाचं गूढ उलगडणार; वाल्मिक कराडसंबंधीत ‘या’ लोकांची होणार नार्को अन् ब्रेन मॅपिंग टेस्ट

या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून एकूण 6 जणांची वैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे.

Mahadev Munde Case: महादेव मुंडे मृत्यू प्रकरणाचं गूढ उलगडणार; वाल्मिक कराडसंबंधीत ‘या’ लोकांची होणार नार्को अन् ब्रेन मॅपिंग टेस्ट

Mahadev Munde Case:  बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे मृत्यू प्रकरणाला आता 6 महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप SIT (Special Investigation Team) च्या हाती ठोस पुरावे लागलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर, तपासाची चक्रे वेगाने फिरवत IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने आता वैज्ञानिक चाचण्यांवर (Scientific Tests) लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत (Forensic Science Laboratory) संशयितांची कसून चौकशी केली जाणार आहे.

सहा जणांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी होणार 
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून एकूण 6 जणांची वैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे. यामध्ये वाल्मीकरांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 2 जणांची नार्को केली जाणार आहे, तर एका संशयिताचे ब्रेन मॅपिंग केले जाईल. संशयितांच्या मनातील माहिती आणि घटनेच्या वेळची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. SIT आता या प्रकरणाचा संबंध ‘कराड’ कुटुंबाशी जोडून त्या दृष्टीने तपासाची दिशा ठरवत आहे. विशेषतः वाल्मीकरांकडे कामाला असलेल्या लोकांचा या गुन्ह्यात नेमका काय सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कराड कुटुंबाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, संबंधित लोकांशी किंवा या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. या दाव्याची सत्यता आता फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच स्पष्ट होऊ शकेल.

हेही वाचा – ‘त्या’ महिलेचा प्रताप ऐकून डोकं चक्रावेल; एका पोत्यात कोंबला पतीचा मृतदेह, बाईकवर प्रियकरासोबत बसून दूर जंगलात फेकून आली आणि…

मुख्य संशयित ‘गोट्या गीते’ अजूनही फरार
या संपूर्ण हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गीते याची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. गोट्या गीतेवर MCOCA (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून, तो सापडल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number