Hingoli News: वसमतमध्ये इतिहासाचं गूढ वाढलं; प्राचीन तलावात सापडला रहस्यमय भुयारी मार्ग, पाहा व्हिडीओ

शहरातील तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन भुयारी मार्ग सापडला असून, या शोधामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Hingoli News: वसमतमध्ये इतिहासाचं गूढ वाढलं; प्राचीन तलावात सापडला रहस्यमय भुयारी मार्ग, पाहा व्हिडीओ

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहराच्या ऐतिहासिक वैभवात गुरुवारी एका अनपेक्षित घटनेने मोठी भर पडली आहे. शहरातील तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन भुयारी मार्ग सापडला असून, या शोधामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मार्ग नेमका कोठे जातो आणि कोणत्या कालखंडातील आहे, याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नेमकी घटना आणि शोधाचा थरार
सुमारे 3 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसमतचा तलाव फुटला होता. आमदार राजू नवघरे यांच्या विशेष प्रयत्नांतून सध्या या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी तलावाच्या संरक्षक भिंतीसाठी जेसीबीच्या साहाय्याने पाया खोदला जात असताना, अचानक दगड आणि चुन्याने बांधलेली एक पक्की भुयारी रचना समोर आली. प्राथमिक पाहणीत हे बांधकाम अत्यंत दर्जेदार असल्याचे दिसून येत असून, हे जुन्या काळातील प्रगत अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना मानला जात आहे.

तर्क-वितर्कांना उधाण आणि नागरिकांची अलोट गर्दी
भुयारी मार्ग सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि हा चमत्कार पाहण्यासाठी तलाव परिसरात हजारो नागरिकांनी गर्दी केली. या मार्गाच्या स्वरूपावरून सध्या शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत. ही तत्कालीन काळातील प्रगत जलवाहिनी (Water Supply System) असावी की युद्धाच्या काळात वापरला जाणारा एखादा गुप्त मार्ग, याबाबत तर्क लढवले जात आहेत. काही ठिकाणी तर ‘गुप्तधना’च्या अफवांचीही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – Dombivali Thane Bus Service: डोंबिवलीकरांसाठी खास गिफ्ट! ठाण्यापर्यंतचा प्रवास होणार सोपा, 4 मार्चपासून सुरू होणार नवी बससेवा

पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपाची मागणी
या ऐतिहासिक वास्तूचे गूढ उकलण्यासाठी आता पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे. माजी नगराध्यक्ष खलील अहमद सौदागर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा मार्ग शहराच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा अधोरेखित करतो, त्यामुळे तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.” पुरातत्व विभागाच्या सखोल तपासणीनंतरच या भुयारी मार्गाचे खरे स्वरूप आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होईल. तोपर्यंत वसमतचा हा तलाव ऐतिहासिक कुतूहलाचे केंद्र बनला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number