Pune Crime : महाराष्ट्र हादरला! 50 तोळे सोने अन् 35 लाख देऊनही विवाहितेचा छळ; पुण्यातील सरपंचाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथील दीप्ती मगर चौधरी या 27 वर्षीय तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

Pune Crime : महाराष्ट्र हादरला! 50 तोळे सोने अन् 35 लाख देऊनही विवाहितेचा छळ; पुण्यातील सरपंचाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime : पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोल आली आहे. सोन्या-नाण्याने मढवून आणि लाखो रुपये देऊनही सासरचा लोभ सुटला नाही आणि अखेर एका विवाहितेने मृत्यूला कवटाळले. उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथील दीप्ती मगर चौधरी या 27 वर्षीय तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, लोणी काळभोर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लग्नानंतर छळाचा पाढा

दीप्तीचा विवाह 7 वर्षांपूर्वी अत्यंत शाही थाटात पार पडला होता. तिची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच असून सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक आहेत. सासरचे प्रतिष्ठित घर असल्याने दीप्तीच्या वडिलांनी लग्नात 50 तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींनी दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. "तू दिसायला सुंदर नाहीस" आणि "तुला घरातील कामे येत नाहीत" असे टोमणे मारून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता.

हेही वाचा – Malad Professor Death Case: मालाड स्थानकावरील प्राध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी; नवीन CCTV फुटेजही आलं समोर

संसार टिकवण्यासाठी वडिलांनी मोजले 35 लाख

दीप्तीचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी तिच्या माहेरच्यांनी सासरच्यांच्या सर्व मागण्या वेळोवेळी पूर्ण केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींना एकदा 10 लाख रुपये रोख आणि त्यानंतर गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. दीप्तीने अनेकदा माहेरी छळाबद्दल सांगितले होते, पण "संसार नेटाने चालवावा" या आशेने माहेरच्यांनी तिला सासरी परत पाठवले.

पोलिसांची कारवाई

दरम्यान, छळाची सीमा ओलांडली गेल्याने दीप्तीने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आपल जीवन संपवलं. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वीच वैष्णवी हगवणे या विवाहितेनेही अशाच प्रकारे जीव दिला होता, ती घटना ताजी असतानाच आता दीप्तीच्या मृत्यूने समाजात संतापाची लाट पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number