Shani Temple: प्रशासनाला न्यायालयाचे आदेश, शनी मंदिराचा कारभार पुन्हा विश्वस्त मंडळाकडे, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती.

Shani Temple: प्रशासनाला न्यायालयाचे आदेश, शनी मंदिराचा कारभार पुन्हा विश्वस्त मंडळाकडे, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Shani Temple: अहिल्यानगर येथील प्रसिद्ध शनैश्वर देवस्थान ट्रस्टवरील कायदेशीर वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्णपणे सोडवला आहे. सचिव आप्पासाहेब शेटे यांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. यानंतर प्रशासकाच्या कारभाराखाली उपजिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांची कार्यकारी समिती स्थापन करून देवस्थानाचे कामकाज सुरू करण्यात आले होते. मात्र, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.

याचिकेत त्यांनी असा युक्तिवाद केला की, श्री शनैश्वर देवस्थान न्यास अधिनियम, 2018 मध्ये प्रशासक नेमण्याची स्पष्ट तरतूद नाही. प्रशासकाची नेमणूक व त्याद्वारे स्थापन केलेली कार्यकारी समिती कायदेशीर नसल्याचे ते म्हणाले. यावर उच्च न्यायालयाने आज सुनावणी करत न्यायाधीशांनी राज्य शासनाचा 22 सप्टेंबर 2025 चा आदेश रद्द करीत प्रशासकाकडे दिलेला कारभार पुन्हा विश्वस्त मंडळाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Chhagan Bhujbal Surgery: छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया; बाळा नांदगांवकरांनी घेतली भेट, फोटो समोर

हा वाद मुख्यत्वे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सुरुवात झाला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनी 500 कोटी, तर स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. त्याच वेळी बनावट अ‍ॅप प्रकरणही समोर आले होते, ज्यात गुन्हा दाखल होऊन काही व्यक्तींना अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा – Pune Ring Road News: मोठी अपडेट! मंत्री दादा भुसेंनी पुणे रिंग रोडबद्दल विधानसभेत दिली माहिती; कामाला निर्णायक गती

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी व त्यांनी स्थापन केलेली प्रशासकीय समिती सात दिवसांच्या आत देवस्थानाचे मालमत्ता व आर्थिक व्यवहार पूर्वीच्या विश्वस्त मंडळाकडे हस्तांतर करतील. तसेच, पुढील नियमावली तयार होईपर्यंत पूर्वीचे विश्वस्त मंडळ देवस्थानाचे कामकाज पाहणार आहे. यामुळे शनैश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेले राजकीय व कायदेशीर वाद आता नियमबद्ध मार्गाने मार्गी लागणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number