Holiday’s In 2026 : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2026 मधील सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर; पाहा संपूर्ण यादी

केंद्र सरकारने 2026 सालासाठी अधिकृत सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले असून, यामध्ये अनेक सण आणि उत्सवांच्या सुट्ट्यांची रेलचेल आहे.

Holiday’s In 2026 : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2026 मधील सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Gazetted Holiday 2026: नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2026 सालासाठी अधिकृत सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले असून, यामध्ये अनेक सण आणि उत्सवांच्या सुट्ट्यांची रेलचेल आहे. हे कॅलेंडर राजपत्रित (Gazetted Holidays) आणि प्रतिबंधित (Restricted Holidays) अशा दोन भागांत विभागण्यात आले आहे.

17 अनिवार्य राजपत्रित सुट्ट्या (Gazetted Holidays List) 

2026 मध्ये एकूण 17 राजपत्रित सुट्ट्या असतील, ज्या दिवशी देशभरातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये बंद राहतील. या यादीमध्ये महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि धार्मिक सणांचा समावेश आहे:

प्रजासत्ताक दिन: 26 जानेवारी, सोमवार
होळी: 4 मार्च, बुधवार
ईद उल फित्र: 21 मार्च, शनिवार
राम नवमी: 26 मार्च, गुरुवार
महावीर जयंती: 31 मार्च, मंगळवार
गुड फ्रायडे: 3 एप्रिल, शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा: 1 मे, शुक्रवार
ईद उल जुहा (बकरीद): 27 मे, बुधवार
मुहर्रम: 26 जून, शुक्रवार
स्वातंत्र्य दिन: 15 ऑगस्ट, शनिवार
ईद उल मिलाद: 26 ऑगस्ट, बुधवार
जन्माष्टमी: 4 सप्टेंबर, शुक्रवार
महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर, शुक्रवार
दसरा: 20 ऑक्टोबर, मंगळवार
दिवाळी: 8 नोव्हेंबर, रविवार
गुरु नानक जयंती: 24 नोव्हेंबर, मंगळवार
नाताळ: 25 डिसेंबर, शुक्रवार

हेही वाचा – Swiggy-Zomato Strike News: स्विगी-झोमॅटो सुरू की बंद? संभ्रम कायम; संपाच्या इशाऱ्यामुळे कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर इन्सेंटिव्हचा पाऊस.. मात्र,..

प्रतिबंधित सुट्ट्यांची यादी (Restricted Holidays) 

कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार, धार्मिक श्रद्धा किंवा प्रादेशिक परंपरेनुसार खालील प्रतिबंधित सुट्ट्यांमधून निवड करू शकतात:

मकर संक्रांती/पोंगल: 14 जानेवारी, बुधवार
बसंत पंचमी: 14 फेब्रुवारी, शनिवार
कामगार दिन: 1 मे, शुक्रवार
मुहर्रम: 17 जुलै, शुक्रवार
रक्षाबंधन: 19 ऑगस्ट, बुधवार
गणेश चतुर्थी: 14 सप्टेंबर, सोमवार
ओणम: 23 सप्टेंबर, बुधवार

हेही वाचा – New Rules For Packaged Food : खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसाठी आता फक्त दावे नाही, तर पुरावे द्या! 1 जानेवारीपासून FSSAI चे नियम बदलणार

बँका आणि खाजगी क्षेत्रासाठी नियम

शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कंपन्या या सुट्ट्यांच्या आधारे आपले नियोजन करू शकतात. मात्र, बँकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि संबंधित राज्य सरकारच्या नियमांनुसार बदलू शकतात, याची नोंद वाचकांनी घ्यावी. या सुट्ट्यांच्या वेळापत्रकामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या सहलींचे आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन आतापासूनच करता येणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number