Andhra Pradesh: क्रूरतेचा कळस! शिक्षिकेने जेवणाच्या डब्याने विद्यार्थिनीच्या डोक्यात केले वार; गंभीर दुखापतीनंतर गुन्हा दाखल

सात्विका नागश्री नावाच्या या विद्यार्थिनीच्या डोक्यावर शिक्षिका सलीमा बाशा यांनी स्टीलच्या लंच बॉक्स असलेल्या पिशवीने वार केला.

Andhra Pradesh: क्रूरतेचा कळस! शिक्षिकेने जेवणाच्या डब्याने विद्यार्थिनीच्या डोक्यात केले वार; गंभीर दुखापतीनंतर गुन्हा दाखल

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर येथे एका सहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षिकेने हिंसाचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात्विका नागश्री नावाच्या या विद्यार्थिनीच्या डोक्यावर शिक्षिका सलीमा बाशा यांनी स्टीलच्या लंच बॉक्स असलेल्या पिशवीने वार केला. या हल्ल्यामुळे विद्यार्थिनीच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गात काही गैरवर्तन केल्याच्या रागातून शिक्षिकेने ही मारहाण केली. सुरुवातीला मुलीच्या आईला दुखापतीची गंभीरता लक्षात आली नाही, परंतु सात्विकाने तीव्र डोकेदुखी व चक्कर येण्याची तक्रार केल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा – Delhi BMW Accident : आरोपी गगनप्रीतला मोठा झटका, न्यायालयीन कोठडी; 'हजारो अपघात होतात', या युक्तिवादामुळे संताप

अखेरीस तिला बेंगळुरूमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे सीटी स्कॅनमध्ये कवटीच्या फ्रॅक्चरची पुष्टी झाली. दरम्यान, पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबाने शिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पुंगनूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा – Meenatai Thackeray : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

तथापी, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील मधुरावदा भागातील श्री तनुश शाळेतही एका शिक्षकावर आठवीच्या विद्यार्थ्याचा हात तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, शिक्षक मोहन यांनी लोखंडी टेबल विद्यार्थ्याच्या हातावर आदळला. ज्यामुळे विद्यार्थ्याचा हात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी या गंभीर दुखापतीला दुजोरा दिला आहे. या घटनांनी आंध्र प्रदेशातील शाळांमधील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांवरील आक्रमक वर्तनाबाबत चिंता वाढवली आहे, आणि समाजात शालेय सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number