Amravati Shocker: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! अक्षता डोक्यावर पडल्या अन् कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

विवाहसोहळा संपून काही तासही उलटले नसताना नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने वऱ्हाडी मंडळींवर शोककळा पसरली.

Amravati Shocker: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! अक्षता डोक्यावर पडल्या अन् कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Amravati Shocker: वरूड तालुक्यातील पुसला येथे मंगलाष्टकांचे सूर, सनईचे संगीत आणि लग्नसोहळ्याची धांदल सुरू असताना अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांना हदरवून सोडले. विवाहसोहळा संपून काही तासही उलटले नसताना नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने वऱ्हाडी मंडळींवर शोककळा पसरली. 31 वर्षीय अमोल प्रकाश गोडबोले या तरुण महसूल सेवकाचा आनंदाचा दिवस दुःखद ठरला. नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील तेजस्विनी हिच्याशी त्यांचा विवाह 25 नोव्हेंबर रोजी पुसला येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभागृहात पार पडला. सकाळपासून मंडपात नातेवाईकांची लगबग, मानपानाचा गडबडगोंधळ, ढोल-ताशांचा गजर सुरू होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

हेही वाचा – MSRTC Student Helpline: विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारचा मोठा निर्णय; MSRTC कडून 24×7 हेल्पलाइन सुरू

लग्न झाल्यानंतर काही तासांतच मृत्यू

मंगलाष्टकांच्या सुरात अमोल-तेजस्विनी यांचा विवाह विधी पार पडला. नवरदेवाला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांचा ओघ सुरू असतानाच अमोल अचानक अस्वस्थ झाला. त्यांना जोरात घाम येऊ लागला आणि तो खाली कोसळला. त्याला तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि नंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले.  

हेही वाचा – BMC Election 2025 : 'सत्याचा मोर्चा'मुळे सत्य आले समोर; मुंबईत सुमारे 11 लाख दुबार मतदार

लग्नसोहळा क्षणात शोकसभेत बदलला

अमोल यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच एकच गोंधळ उडाला. क्षणभरापूर्वी सनई-चौघडे वाजत असलेल्या मंडपात शोकाकुल शांतता पसरली. वऱ्हाड्यांनी भरलेला सभागृह काही क्षणांत रिकामा झाला. नववधू तेजस्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिला मोठा मानसिक आघात बसला आहे. पुसला परिसरात तसेच महसूल विभागातील सहकाऱ्यांमध्येही या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number